



सोलापुरात काँग्रेस आघाडीसाठी बॅकफूटवर ; रॉकी नाराज, आघाडीत कोण कोण? अशा झाल्या जागावाटप
सोलापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सोलापुरात महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. वर्षानुवर्ष महापालिकेत सत्तेत राहिलेला काँग्रेस यंदा एकूणच राजकीय वातावरण आणि समीकरणे पाहून बॅक फुटवर गेले आहे.
सोलापुरात महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांची आघाडी झाली आहे.
आघाडीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष महेश गादेकर, माजी आमदार प्रकाश एल्गुलवार, माजी आमदार अडम मास्तर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी, महिला आघाडीच्या अस्मिता गायकवाड, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांची बैठक गादेकर यांच्या सिटी पार्क हॉटेलवर झाली. त्यानंतर महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
काँग्रेस 45, शिवसेना 30, राष्ट्रवादी काँग्रेस 20, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी 7 असे 102 जागेचे वाटप करण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक सहा मध्ये काँग्रेसचे रॉकी बंगाळे हे इच्छुक आहेत आणि त्यांनी एका जागेसाठी मागणी केली पण शिवसेना प्रभागातील चारही जागा मागणीवर ठाम राहिले त्यामुळे बराच वेळ आघाडीची घोषणा झाली नाही. चेतन नरोटे यांनी रॉकी बंगाळे यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र बंगाळे हे सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्या संपर्कात दिसून आले. प्रणिती शिंदे यांनी बंगाळे यांना एक जागा देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती काही वेळापूर्वी मिळाली.
आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाच जागेची मागणी केली होती. परंतु शेवटी तीन जागेवर सुद्धा ते समाधानी होते प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक एक मधील जागेसाठी महिंद्रकर आणि इंगळे यांची मागणी होती पण जागा वाटपामध्ये मनसेला एकही जागा दिसत नाही शिवसेना आपल्या 30 जागेमधील काही जागा मनसेला देणार असल्याची माहिती मिळाली.




















