सोलापुरात कसं, शाब्दी म्हणतील तसं ; एम आय एम कार्यकर्ते शाब्दिंच्या पाठीशी खंबीर !
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वांचे लक्ष लागलेल्या एमआयएम पक्षाच्या शहराचे अध्यक्ष फारुख शाब्दि यांनी अचानक आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळासह कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली.
शाब्दि हे राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसून आले. एकूणच पक्षात चाललेल्या वातावरणामुळे शाब्दि नाराज असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे महानगरपालिकेची उमेदवार निवड कोणाच्या नेतृत्वाखाली होणार याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान एमआयएम कडून इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता 75 टक्के कार्यकर्त्यांमधून फारुख शाब्दि सांगेल तो पक्ष घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल अशा प्रतिक्रिया ऐकण्यास मिळाल्या. यावरून शाब्दि यांच्या पाठीशी सोलापुरातील बहुसंख्य कार्यकर्ते, मुस्लिम समाज असल्याचे सुद्धा पाहायला मिळते.
महाराष्ट्रातील सोलापूर शहरात All India Majlis-e-Ittehadul Muslimeen (AIMIM) पक्षांतर्गत राजकीय घडामोडींना वेग आला असून, सोलापूरचे शहर अध्यक्ष Farooq Shabdi यांच्या विरोधात पक्षाकडून संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आरोप पुढे येत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, अलीकडच्या काळात सोलापुरातील पक्ष संघटनेत काही महत्त्वाचे निर्णय व बदल हे कोणतीही पूर्वसूचना न देता घेतले गेले. या निर्णयांमुळे फारूक शाब्दी यांची भूमिका कमकुवत करण्याचा हेतू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, जर पक्ष बळकट करणे हाच खरा उद्देश असता, तर सर्व ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन पारदर्शक पद्धतीने निर्णय घेतले गेले असते. मात्र सध्याच्या घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी उघड होत असल्याचे चित्र दिसत आहे.
या प्रकारामुळे सोलापुरातील AIMIM कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्ष नेतृत्वाकडून यावर कोणते स्पष्टीकरण दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





















