सोलापुरात मनसेच्या या पोस्टरने चर्चेला तोंड फोडले ! औरंगजेबाची कबर……
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब याच महाराष्ट्रात गाडला गेला. त्याची कबर शौर्याचा प्रतीक म्हणून ठेवावे असे आदेश कार्यकर्त्यांना दिले. त्यानुसार सोलापुरातील कार्यकर्त्यांनी तुळजापूर नाका येथे एक बॅनर लावले आहे. त्यामुळे सध्या सोलापुरात नव्या चर्चेला तोंड फुटल्याचे पाहायला मिळते.
या राज ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात आम्ही अशीच बॅनरबाजी करणार असल्याची प्रतिक्रिया सोलापुर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी दिली.
सोलापुरातील तुळजापूर रोड या ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आले आहे.
सदर वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष बाळासाहेब सरवदे, शहर उपाध्यक्ष पवन देसाई,वैभव रंपुरे आदी उपस्थित होते.