एमआयएम अध्यक्ष फारूक शाब्दी यांची होणार डोकेदुखी ; सोलापुरात हा नेता मध्य साठी इच्छुक
एमआयएम सोलापूर शहराध्यक्ष फारुख शाब्दि यांचे निकटवर्तीय मानले जाणारे व कट्टर समर्थक एमआयएम चे शहर युवक अध्यक्ष मोहसीन मैंदगीॅकर हे सुध्दा सोलापूर शहर मध्य मधून एमआयएम पक्षाकडुन इच्छुक असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. त्यामुळे शाब्दी यांची डोकेदुखी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मोहसीन मैंदगीॅकर हे पक्षात युवक अध्यक्ष म्हणून मागील 4 वर्षा पासून काम करत आहे, मोहसीन मैंदगीॅकर हे पक्ष वाढवण्या करीता दिवस रात्र काम करताना दिसतात, फारुख शाब्दि हे मुंबई मध्ये असताना पक्षातील सर्व जबाबदारी त्यांच्याकडे असते व पक्षाला नेहमी चर्चेमध्ये ठेवण्या करीता अनेक कार्यक्रम घेतात, वेगवेगळ्या विषयावर निवेदन देतात, आंदोलन करतात.
मोहसीन मैंदगीॅकर यांनी कोव्हीड काडात फार चांगले काम केल्याचे पाहायला मिळाले, प्रत्येक वेळी गोरगरिबासाठी धावून जातात, राजकीय काम करताना त्यांच्यावर अनेक राजकीय गुन्हे दाखल झाले आहेत. युवकांच्या मदतीला धावून जात असल्याने त्यांच्या पाठी मागे युवकांची मोठी फळी उभारलेली नेहमी दिसते तसेच पक्षातील राष्ट्रीय अध्यक्ष बैरिस्टर अस्सौद्दीन औवेसी व पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी यांच्या सोबत त्यांचे चांगले संबंध असून पक्षातील सर्व वरिष्ठ नेते त्यांच्या संपर्कात आहेत. प्रत्येक वेळी सोलापुरातील पक्षाच्या कामाची दखल पक्षातील वरिष्ठ मोहसीन मैंदगीॅकर यांच्या संपर्कात राहून घेत असतात.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवला, मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरली आहेत. सुरुवातीला एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते अलिप्त राहिले पण मुस्लिम समाजाच्या अस्तित्वावर विषय आला तेव्हा मोहसीन मैंदगीॅकर यांनी उघडपणे काँग्रेसला सपोर्ट केले, आपल्या भागातून चांगले मताधिक्य दिले त्यामुळे समाजात त्यांच्याबद्दल चांगला संदेश गेला आहे.