सोलापूर : सोलापूर लोकसभेची निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली आहे . मात्र अद्याप भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निश्चित झालेला नाही अनेक ठिकाणी ही चर्चा सुरू आहे. यावेळी सोलापुरातून स्थानिक उमेदवार असावा आणि तो आंबेडकरी जनतेचा असावा अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यावर मधून पुढे येत आहे.
भारतीय जनता पार्टीचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते व दैनिक नालंदा एक्सप्रेस या वृत्तपत्राचे संपादक दिलीप शिंदे यांनी सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी भाजपच्या वरिष्ठाकडे केली आहे.
दिलीप शिंदे हे बौद्ध समाजाचे आहेत . सोलापूर मतदारसंघ राखीव असल्याने या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीची मते मोठ्या प्रमाणात आहेत दिलीप शिंदे यांनी मुंबई, नागपूर, पुणे या ठिकाणी जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी ,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील जिल्हाचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख ,शहराध्यक्ष नरेंद्र काळे ,माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना निवेदन देऊन उमेदवारीची मागणी केली आहे . तसेच सोलापूर शहर जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक मान्यवरांच्या भेटी दिलीप शिंदे घेतल्या आहेत.
1990 साली स्व. प्रमोदजी महाजन यांच्या हो मैदान येथील जाहीर सभेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातून त्यांनी भाजपात प्रवेश केला .स्व. प्रमोदजी महाजन ,स्व. शरदभाऊ कुलकर्णी, स्व.लिंगराज वल्याळ,आ. विजयकुमार देशमुख ,आ.सुभाष देशमुख ,किशोर देशपांडे ,मोहिनी पत्की यांच्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून कशाची अपेक्षा न बाळगता कार्य केले आहे. पक्षाच्या विविध आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.अनेक वेळा त्यांना अटक झाली . पक्षाच्या विविध सभा यशस्वी होण्यासाठी त्यांनी काम केले. बूथ यंत्रणेपासून ते छोट्या मोठ्या स्टेज सभा सांभाळल्या आहेत.
पक्षातील लक्षणीय सहभाग:
मा. लालकृष्णजी अडवणी यांच्या रथयात्रेत दिवस रात्र सहभाग
सोलापुरात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अधिवेशन झाले या अधिवेशनात नेत्यांच्या सोयीपासून ते व्यासपीठ ,आणि परिसरातील काम नेटकेपणांनी केले एक मागासकीय कार्यकर्ता सक्रिय राहिला याची दखल त्यावेळी स्व.शरदभाऊ कुलकर्णी यांनी प्रदेश कार्यालयात विशेष निमंत्रण करून सत्कार केला होता.
उमा भारती यांच्या नेतृत्वाखाली राम मंदिर साठी भव्य सभा झाली ही सभा यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान दिले .छोटे मोठे पडेल ती कामे केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागात यूपीएससी ,एमपीएससी अभ्यासासाठी पुस्तके, गरिबाच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांना प्रोत्साहन देणे दलित वाड्यावर इतर समाजाच्या विद्यार्थ्यांना समाज उपयोगी उपक्रम राबवले , त्याची कामे केली. व्यवसायिकांना अनेक ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केला ,आरोग्य, शिक्षणावर विशेष त्यांनी कार्य केले.
दिलीप शिंदे यांचे शिक्षण बारावी डी फार्मसी झाले असून त्यांची पत्नी शासकीय सेवेत वर्ग दोन पदावर कार्यरत आहेत . त्यांच्या दोन मुली डॉक्टर असून मुलगा पुणे येथे एमबीबीएस वैद्यकीय शिक्षण घेत आहे .पक्षात त्यांनी शहर उपाध्यक्ष, शहर अनुसूचीत जाती मोर्चाचे सरचिटणीस पदी काम केले आहे .त्याकाळी आंबेडकरी कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीत काम करणे कठीण होते . अशा कठीण प्रसंगी अशावेळी त्यांनी काम केले . त्यावेळी जवळपास 450 कार्यक्रम स्वखर्चाने राबवले.
दिलीप शिंदे यांना बौद्ध आंबेडकरी व सर्वच समाजातून प्रचंड पाठिंबा आहे . त्याचा भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी लोकसभेच्या जागा लढवताना मोठा उपयोग होणार आहे तसेच दिलीप शिंदे यांना समाजात प्रतिष्ठीत मानले जातात. ते सोलापूरपासून मंत्रालय स्तरावरचे पत्रकार असल्याने सोलापूरच्या प्रश्नांची त्यांना चांगलीच जाण आहे. पक्षाला मागील कटू अनुभव पाहता , यावेळी आंबेडकरी समाजाचे स्थानिक नेतृत्व करणारे जुने जाणते दिलीप शिंदे यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी द्यावी . प्रबळ दावेदार ठरतील अशी त्यांची कामगिरी झाली असल्याची भावना भाजपा कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे.