क्या बात है ! सिईओ कुलदीप जंगम सोलापूरचे 15 दिवस कलेक्टर
सोलापूर : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पंधरा दिवस रजेवर जाणार आहेत त्यांचा पदभार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे दिला असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना 21 जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. ते आता पंधरा दिवस खाजगी रजेवर जात आहेत त्यामुळे त्यांनी आपला पदभार सीईओ जंगम यांच्याकडे दिला आहे.
कुलदीप जंगम यांना सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये येऊन अकरा महिने झाले आहेत. त्यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी आपला पदभार सोपवला आहे. यामुळे तब्बल पंधरा दिवस जंगम हे सोलापूरचे जिल्हाधिकारी असणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचा अनुभव त्यांना मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या आषाढी वारीमध्ये कुमार कुलदीप या जोडीने वारीचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केल्याचे पाहायला मिळाले.
कलेक्टर पदाचा अतिरिक्त कार्यभार जंगम यांच्याकडे मिळाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.