भागाईवाडीच्या सरपंच छाया जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करा ; तहशीलदाराचे आदेश
सोलापूर (प्रतिनिधी)ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना अनेक चुका व हेराफेरी करुन सदस्य व सरपंच पदाचा लाभ घेतल्याप्रकरणी भागाईवाडीच्या सरपंच छाया जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उत्तर सोलापूरचे तहशीलदारांनी दिले आहेत.
भागाईवाडी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी आरक्षीत असताना छाया जाधव यांनी अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.तर अनेक ठिकाणी चुका,हेराफेरी,माहीती लपवणे,असे असताना त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिका-यांनी नामंजूर करणे आवश्यक असताना अर्ज वैध ठरवला.
या विरोधात माजी सरपंच,विद्यमान सदस्य सौ.कविता घोडके पाटील यांनी राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे तक्रार दाखल करून चौकशीची मागणी करुन कारवाई करण्याची मागणी केली.या तक्रार अर्जाची चौकशी करुन उमेदवारी अर्जातील अक्षम्य चुका,हेराफेरी या बाबी लक्षात घेऊन तहशीलदार उत्तर सोलापूर यांनी ततकालीन निवडणूक अधिकारी यांना प्राधिकृत करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत
तहशीलदार उत्तर सोलापूर यांनी दिलेल्या आदेशानुसार प्राधिकृत अधिकारी या आदेशाची कधी अमंंलबजावणी करणार याची प्रतिक्षा आहे
लोकशाही राज्यात अश्या प्रवृत्तीचे काम करणा-यावर लवकर कारवाई होणे आवश्यक
छाया जाधव यांनी चुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करुनही निवडणूक अधिका-यांनी तो वैध ठरवला.याची चौकशीसाठी केलेल्या तक्रार अर्जाच्या चौकशीस दोन वर्ष लागले.अशा तक्रारीची दखल प्रशासन,न्यायालयात लवकर होणे आवश्यक आहे चौकशी,न्यायप्रक्रीया विलंबामुळे अनेक जण पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करतात.मात्र या प्रकरणी चौकशीअंती उशीरा का होईना चुकीला माफी नाही हे दिसुन आले.
कविता घोडके-पाटील,
माजी सरपंच