सांगोल्याच्या शहाजी बापूंसह शिवसेनेची 45 जणांची पहिली यादी जाहीर ; सोलापूर जिल्ह्यात कुणाला मिळाली उमेदवारी
सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पहिली 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यात आले आहे.
सोलापुरातील सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनाही उमेदवारी मिळाली आहे सर्वांचे लक्ष लागलेल्या सोलापूर शहर मध्ये तसेच करमाळा माढा हे मतदारसंघ मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत.