दिलीप कोल्हेंकडे शिवसेनेचे अधिकृत कोणतेच पद नव्हते ; ते आले काय अन् गेले काय फरक पडत नाही ; महेश नानाचा पलटवार
सोलापूर : सोलापुरात ईद ए मिलाद सणाचे औचित्य साधून कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचे आयोजन शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नियोजन समितीचे सदस्य समी मौलवी यांनी केले आहे. त्या पत्रकार परिषदेला लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांची प्रमुख उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. तसेच काँग्रेस नेते शकील मौलवी यांचीही उपस्थिती बरेच काही सांगून गेली.दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते दिलीप कोल्हे यांनी संपर्कप्रमुख महेश साठे यांच्यावर आरोप करून शिवसेना सोडण्याची भूमिका जाहीर केली. सोलापूर शहरात महेश साठे यांचा होत असलेला हस्तक्षेप यावर ते नाराज दिसून आले.
याविषयी महेश साठे यांना विचारले असता दिलीप कोल्हे यांचे नाव न घेता त्यांनी संबंधित माणसाकडे आमच्या पक्षाचे अधिकृत कोणतेही पत्र आणि पद नव्हते. ते असले नसले तरी पक्षाला काही फरक पडत नाही कारण ते सकाळी एकाकडे, दुपारी दुसरीकडे, आणि रात्री तिसरीकडे असतात. अशांना पक्ष महत्त्व देत नसल्याचा टोला त्यांनी हाणला.
दिलीप कोल्हे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सावंत तुमच्यावर आरोप करत आहेत असे वाटत नाही का? या प्रश्नावर त्यांनी कोण कोणाचा खांदा वापरते हे त्यांनी ठरवावे परंतु दोन पैसे कुणाला मिळतात म्हणून खांदा द्यायचा हे कितपत योग्य आहे त्यांनी आत्मचिंतन करावे अशी भूमिका त्यांनी मांडली.