सोलापुरात शिक्षक बदलीच्या ठिकाणी गोंधळ ; पवित्र पोर्टलच्या 38 शिक्षकांना अपात्रतेची नोटीस
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया सोमवारी सुरू झाले आहे. ही बदली प्रक्रिया नेहरू वसतिगृहाच्या सभागृहात सुरू असल्याने या ठिकाणी बदलीसाठी शिक्षकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळते.
दरम्यान पवित्र पोर्टल द्वारे आलेल्या 248 शिक्षकांपैकी 38 शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागाने अपात्रतेची नोटीस दिल्याने या शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण असून कागदपत्र तपासताना शिक्षण विभाग झोपला होता काय? असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, उपशिक्षणाधिकारी संजय जाविर यांच्यासह प्राथमिक शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे यंत्रणा समुपदेशाने बदली प्रक्रिया राबवत आहे.
दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेला शासनाने नव्याने भरती प्रक्रियेतून पवित्र पोर्टल द्वारे मराठी माध्यम साठी नव्याने 223, कन्नड माध्यम साठी 10 व उर्दू माध्यम साठी 15 असे एकूण 248 शिक्षक जिल्हा परिषदेला या भरतीतून मिळाले आहेत.
आचारसंहितेच्या पूर्वी या शिक्षकांच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये 38 शिक्षकांना वेगवेगळे कागदपत्र नसल्याने अपात्रतेची नोटीस दिले असल्याचे समजले. ही माहिती मिळताच
डी एड बी एड राज्य संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर यांनी नेहरू वस्तीग्रह येथे धाव घेऊन थेट शिक्षण आयुक्तांनाच फोन लावून दिला त्यामुळे या शिक्षकांना थोडाफार धीर मिळाला आहे.
मगर यांनी माहिती देताना शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली ते काय
म्हणाले पहा…