धन्यवाद देवाभाऊ, आपणच आमचे कुटुंब प्रमुख !
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी माझ्या पक्षप्रवेशाप्रसंगी मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी “तू काळजी करू नकोस, मी तुझं पालकत्व स्वीकारतो” म्हटलं होतं. पुढे माझ्याकरिता जागा सोडवून घेणे असो की माझ्या विधानसभा निवडणूकीची यंत्रणा बारकाईने हाताळणे साहेबांनी आपला शब्द तंतोतंत पाळला.
ऐतिहासिक मताधिक्याने झालेल्या माझ्या विजयानंतर थोड्याच दिवसात आम्हा कोठे कुटुंबीयांवर दु:खाचे डोंगर कोसळले. माझे काका महेश अण्णा कोठे यांचे प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात आकस्मिक निधन झाले. या संकटकाळात देखील मा देवेंद्र फडणवीस साहेब कुटुंबप्रमुखाप्रमाणे आमच्या पाठीशी उभे राहिले. काकांच्या निधनानंतर माझ्या छोट्या भावाला म्हणजेच प्रथमेश महेश कोठे यांना सोबतच घ्यावे, एकटे पडू देऊ नये ही माझी इच्छा होती. त्याचबरोबर स्व. महेश अण्णा कोठे यांचा प्रभाव असलेल्या विडी घरकुल भागातील आजी-माजी लोकप्रतिनिधींना सोबत घेतल्यास पक्षाला देखील फायदेशीर ठरेल म्हणून पालकमंत्री ना जयकुमार भाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फडणवीस साहेबांशी आणि पक्षातील वरिष्ठांशी चर्चा केली. अखेर काल दि. ११ नोव्हेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण साहेब व पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात माझे बंधू माजी नगरसेवक प्रथमेश महेश कोठे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेविका कुमुद अंकाराम, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, माजी नगरसेवक शशिकांत कैंची, परिवहन समितीचे माजी सदस्य परशुराम भिसे, संतोष सोमा, जोशी समाज शहर अध्यक्ष युवराज सरवदे, अक्षय वाकसे, तुषार पवार, वासुदेव यलदंडी, दिनेश गुर्रम, दीपक राजुल, वैभव दोशी, भीमाशंकर अंकाराम, सागर भोसले, स्वप्नील वाघमारे, अमित अंकाराम, सुमीत अंकाराम, आकाश भोसले आदींचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.
पक्षप्रवेश केलेल्या सर्वांसोबत आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली व आगामी काळासाठी आशीर्वाद घेतला. या भेटीदरम्यान साहेबांनी माझे काका स्व. महेश अण्णा कोठे यांच्या आठवणी शेअर करत उपस्थित आम्हा सर्वांना प्रोत्साहन दिले व आगामी काळात सुध्दा असेच पाठीशी राहणार असल्याबाबत आश्वस्थ केले.
या प्रेरणादायी भेटीतून ऊर्जा घेऊन आम्ही पुन्हा पक्ष कार्यालयात सोलापूर शहर निवडणूक प्रभारी श्री रघुनाथजी कुलकर्णी, भाजपा सरचिटणीस श्री श्रीकांत भारतीय साहेब व श्री कर्जतकर साहेबांची भेट घेतली.
भाजपा परिवार वाढवतानाच माझं पालकत्व स्वीकारलेल्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आज आमचा कोठे परिवार सुद्धा एकत्र आणला याचा मनस्वी आनंद झाला.
मा. देवाभाऊंविषयीची कृतज्ञता मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. मात्र नव्याने पक्षात आलेल्या सहकाऱ्यांना सोबत घेत घराघरात व मनामनात भाजपाचे राष्ट्रहिताचे विचार रुजवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन याची ग्वाही देतो.
– देवेंद्र राजेश कोठे


















