छत्रपती संभाजी चौकात रातोरात बसवले शंभर फुटी शिवाजी महाराजांचे डिजिटल ; शिवप्रेमींना पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक का? पुरुषोत्तम बरडे यांचा सवाल
सोलापूर : शनिवारी फौजदार चावडी पोलिसांनी महानगरपालिकेच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत लावण्यात आलेले शिवजयंतीचे मोठमोठाले डिजिटल कारवाई करत काढले. पोलिसांच्या या कारवाईने शिवप्रेमी मधून प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे.
दरम्यान छत्रपती संभाजी चौकात शिवप्रभू प्रतिष्ठानच्या वतीने शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे यांच्या माध्यमातून रातोरात शंभर फुटी आडवा डिजिटल लावण्यात आला आहे. या डिजिटल वर कोणत्याही कार्यकर्त्याचे फोटो नाहीत केवळ छत्रपती शिवरायांचे फोटो आहेत.
याप्रकरणी पुरुषोत्तम बर्डे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की, फौजदार चावडी पोलिसांकडून शिवप्रेमींना शनिवारी अपमानास्पद वागणूक देण्यात आली, त्याचा मी निषेध करतो, अत्यंत घृणास्पद पद्धतीने डिजिटल काढून टाकण्यात आले. छत्रपती शिवाजी चौक हा नो डिजिटल झोन आहे परंतु छत्रपती संभाजी चौक नी डिजिटल झोन नाही असे असतानाही या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे आम्ही शनिवारी रात्री या ठिकाणी शंभर फुटाचा डिजिटल बसवला आहे.