चेतन नरोटे यांना रामवाडी भागातून मताधिक्य देणार ; हजारोंच्या उपस्थितीत गणेश डोंगरे यांचा निर्धार
सोलापूर- खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 22 रामवाडी भागात शहर मध्य विधानसभा महाविकास आघाडी काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेमध्ये हजारोंच्या संख्येने मतदारांनी निवडून आणण्याचा निर्धार केला.
या सभेचे स्वागत प्रास्ताविक आयोजक युवक कॉंग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी तर आभार प्रदर्शन युवा नेते विक्रम गायकवाड यांनी केले.
माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी नगरसेवक विनोद भोसले, मदन गायकवाड, महिला काँग्रेस अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, डि ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष देवा गायकवाड, युवा नेते अनिल जाधव, तिरुपती परकीपंडला, मागासवर्गीय काँग्रेस सेल अध्यक्ष मयूर खरात, राजनंदा गणेश डोंगरे व इतर मान्यवरांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली.
खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हणाल्या, मी गेली 15 वर्ष या भागाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य मला तुमच्यामुळे मिळाले.खासदार निवडणूकीत शहर मध्य मधून प्रभाग क्रमांक 22 मधून सर्वाधिक मताधिक्य मिळाले. अशाच पध्दतीने काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले उमेदवार चेतनभाऊ यांना जास्तीतजास्त मतांनी निवडून दया. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात महालक्ष्मी योजनेतून महिलांना महिन्याला 3000 रूपये व महिलांना मोफत बसप्रवास, बेरोजगार युवकांना भत्ता 4000 रुपये, नागरिकांना 25 लाखांचा आरोग्य विमा, शेतकऱ्यांना 3 लाख पर्यंतची कर्जमाफी, जातीय जनगणना करून 50% आरक्षण मर्यादा हटवणार.अशा पाच गॅरंटी आम्ही देणार आहोत असे सांगितले.
या सभेचे आयोजक सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, युवा नेते विक्रम गायकवाड, चंद्रकांत नाईक, सचिन गायकवाड, दाऊद नदाफ, दिनेश डोंगरे, दत्ता हरभरे, रितेश जाधव, युवराज जाधव, गोपाल शिंगे यांनी परिश्रम घेतले.