चंद्रनील फाउंडेशनचा दहीहंडी द्वारे भारतीय जवानांना मानाचा मुजरा ; सर्वाक्षिय नेते थिरकले !
सोलापुर : दहीहंडी निमित्त चंद्रनील सोशल फाउंडेशन च्या वतीने दहीहंडी चे आयोजन करण्यात आले होते, वडार समाजाच्या मानाच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली, चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या यंदाच्या वर्षी भारतीय सैन्याचा गौरव करणारा हलता देखावा सादर करण्यात आला, यावेळी खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे आणि चंद्रनील सोशल फाउंडेशन तथा काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सीए सुशील बंदपट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यंदाच्या वर्षी चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून भारतीय जवानांचा गौरव करणारा हवेतील हलता देखावा सोलापूरकरांना याचीदेही पाहता आला, भारतीय सैन्याने भारतीयांसाठी केलेले शौर्य, कारगिल युद्ध, 26/11, भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा केलेला नायनाट, पुलावमा असे भारतीय जवानांचे अंगावर शहारे आणणारे शौर्य पाहून उपस्थितांनी भारत माता की जय अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला, यावेळी वीर माता वीर पत्नीचा सन्मान देखील चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
चंद्रनील सोशल सोशल फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद असून, प्रत्येक वर्षी दहीहंडी निमित्त विविध देखावे सादर केले जातात, परंतु यंदाच्या वर्षी प्रथमच चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीने सीए सुशील बंदपट्टे यांनी भारतीय जवानांचा गौरव दाखवणारा हवेतील देखावा सादर केला, तसेच वीर माता आणि वीर पत्नी यांचा सन्मान केला, सुशील बंदपट्टे यांचे चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून असेच समाजोपयोगी आणि सामाजिक कार्य घडो अशा शुभेच्छा खासदार प्रणिती शिंदे यांनी दिल्या.
यावेळी चेतन नरोटे, विनोद भोसले, अमोल शिंदे, जगदीश पाटील, पद्माकर नाना काळे, आनंद चंदनशिवे, राजाभाऊ कलकेरी, राजन जाधव, गणेश डोंगरे, अजय दासरी, सुधीर खरटमल, श्रीकांत डांगे, तात्या वाघमोडे, अंबादास शेळके, दीपक जाधव, महेश अलकुंटे, संतोष इरकल, अशोक यमपुरे, गुणाजी भांडेकर, विकास इटकर, बंडू कुलकर्णी, बंटी यमपुरे, सुशील कंमुरे, राहुल भांडेकर, प्रकाश शिंगाडे, भीमाशंकर बंदपट्टे, मुंन्ना यमपुरे, श्रीनिवास यमपुरे, प्रिया बसवंती, सुशीला अबुटे, प्रमिला तुपलवंडे, हेमा चिंचोळकर, मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी व वडार समाज मोठया संख्यने उपस्थित होते.