सोलापूर : जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे या आल्यापासून झेडपीला घरपण आल्याचे चित्र आहे. त्यांनी मुख्यालयाच्या स्वच्छतेकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त लावण्याचा त्या प्रयत्न करीत आहेत. सध्या त्यांच्या पीए बदलीचा विषय गाजत आहे.
गुरुवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी स्वीय सहाय्यकांचे काम पाहत आहे, माझे काम हलके करणारे कर्मचारी हवे नाही की माझी डोकेदुखी वाढवणारे, आठ दिवस मी काम बघणार जर नाही आवडले तर काढून टाकेन आणि दुसरा नियुक्त करेन असे स्पष्ट सांगितले.
नेहरू वसतिगृहाच्या गाळेधारकांना 15 ऑगस्ट पर्यंत शेवटची मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत थकीत गाळे भाडे न भरल्यास थेट कारवाई करेन असा इशारा त्यांनी दिला.
जिल्हा परिषदेच्या बिंदू नामावलीचे काम वेगात सुरू आहे, त्यासाठी वेगाने कामकाज व्हावे म्हणून सभापतींचे कार्यालय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत असं सांगतानाच शिक्षण विभागाला पूर्णवेळ अधिकारी असावा ती गरज आहे परंतु त्यासाठी दोन महिने वाट पाहावी लागेल असे त्यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी त्यांनी सकाळच्या सुमारास सर्वच कार्यालयांना अचानक भेटी दिल्या यासह जिल्हा परिषदेचा संपूर्ण परिसर पाहिला. बऱ्याच ठिकाणी भंगार पडून आहे. अनेक कार्यालयाच्या परिसरात अस्वच्छता पाहायला मिळते, आपली कार्यालय स्वच्छ आणि टापटीप ठेवावीत अशा सूचना सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत तसे न आढळल्यास दंड करावा लागेल असेही त्या म्हणाल्या.
वैराग या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागेवर गाळे आणि नव्याने शाळा वर्ग बांधून ती जागा बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा विचार आहे त्यासाठी प्रोजेक्ट प्रेसेंटेशन मागवले असल्याचे त्यांनी सांगितले. यासह जिल्हा परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यात असलेल्या मालमत्ता याची माहिती ही मागवली असल्याचे त्या म्हणाल्या.