बी आर एस पक्षाच्या नेत्यांची शासकीय विश्रामगृहावर भेट घेतलेल्या माजी नगरसेवक रविकुमार यलगुलवार यांचे सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.त्यांचे निवडीचे पत्र शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारसी नुसार माजी नगरसेवक रविकुमार यलगुलवार यांची सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून त्यांचे निवडीचे पत्र शहर अध्यक्ष चेतन नरोटे, हस्ते महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, माजी महापौर सुशिला आबूटे, प्रवक्ते अशोक निंबर्गी, माजी नगरसेवक विनोद भोसले, प्रवीण निकाळजे यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन येथे प्रदान करण्यात आले.
यावेळी भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, संजय गायकवाड, संध्या काळे, दिनांनाथ शेळके, विना देवकते, हेमाताई चिंचोळकर, करीमनिस्सा बागवान, शोभा बोबे, सुमन जाधव, मीरा घटकांबळे, संघमित्रा चौधरी, आदि उपस्थित होते.