भाजप देणार वडार समाजातील सुशिक्षित चेहरा ; ‘सुशील’च्या नावाची सर्वत्र चर्चा
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडे इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. 102 जागेसाठी तब्बल 1000 हून अधिक कार्यकर्त्यांनी उमेदवारीची मागणी अर्ज दाखल केले आहेत.
अनेकांनी पक्ष बदलून भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. काँग्रेस पक्षाचे माजी कार्यकारी अध्यक्ष सीए सुशील बंदपट्टे यांनी काही दिवसापूर्वीच शहर उत्तर मधील एकूणच भाजपचे वातावरण पाहता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
प्रभाग चार मध्ये भारतीय जनता पार्टी कडून ओबीसी सर्वसाधारण मधून आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांनी उमेदवारी देण्याची मागणी केली असून त्या पद्धतीने त्यांनी पक्षाच्या कार्यालयात जाऊन मुलाखत दिली.
सुशील बंदपट्टे हे वडार समाजातील उच्चशिक्षित युवक असून समाजातून सुद्धा त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले जात असल्याचे समोर आले आहे. समाजाच्या मागील नगरसेवकाने अनेक कारनामे करत स्वतः सह पक्षाला अडचणीत आणले होते. त्यामुळे नेते व त्यांच्यावर नाराज असल्याचे समजते.
मागील अनेक वर्षापासून चंद्रनील सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. विशेष करून महिला वर्गांसाठी शासनाच्या सर्व योजना त्यांनी मोफत पणे राबवल्या आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी अतिशय झोकून देऊन काम केले.
धार्मिक कार्यात ते कायम अग्रेसर असतात. गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, दहीहंडी सोहळा आयोजित करताना संपूर्ण सोलापूरचे लक्ष वेधले आहे. यंदाच्या शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांना संधी देण्यात आली. या युवकाने हा शिवजन्मोत्सव सोहळा अतिशय उत्कृष्टपणे पार पाडताना विविध सामाजिक उपक्रम राबवले.
त्यांनी आपल्या कार्याचा अहवाल इच्छुकांच्या मुलाखती दरम्यान पक्षाला सादर केला आहे या अहवालाची भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात चर्चा आहे. प्रभाग क्रमांक चार मध्ये एक अनुसूचित जाती महिला, ओबीसी सर्वसाधारण, सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण आहे. हा प्रभाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. वडार समाजामध्ये सुशील बंदपट्टे यांच्या या निर्णयाचे स्वागत होत असून समाजातील सुशिक्षित, उच्चशिक्षित असा युवक जर महापालिकेतच्या सभागृहात गेला तर निश्चितच समाजाचे प्रश्न, समस्या आणि प्रभागातील मूलभूत सुविधा यावर प्रकाश पडेल यामध्ये कोणतीही शंका नाही.





















