भाजपच्या नरेंद्र काळे यांना धक्का ; ओबीसी महिलेसाठी आरक्षित, हरकती दरम्यान आयुक्तांशी “तू तू मैं मैं” ; पहा कोणते प्रभाग झाले ओबीसी अन् सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित
सोलापूर : राज्य निवडणूक आयोगाने आदेश दिल्याप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेच्या ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांचे आरक्षण प्रक्रिया सोडत सुरू होती. मात्र भाजपचे माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांचा प्रभाग क्रमांक 24 मधील ओबीसी सर्वसाधारण आरक्षण थेट महिलेसाठी राखीव झाले. त्यामुळे त्यांनी महापालिका आयुक्त यांच्या या प्रक्रियेवर हरकत घेतली.
ओबीसीच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही परंतु या प्रक्रियेलाच विरोध असल्याचे त्यांनी कडाडून सांगितले. महापालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी या प्रक्रियेवर तुम्हाला हरकत घेण्यासाठी मुदत आहे त्यामुळे प्रक्रिया होऊ द्या असे सांगितले. मात्र काळे ऐकायला तयार नव्हते ते आक्रमक दिसून आले यावेळी आयुक्त आणि काळे यांच्यात तू तू मैं मैं झाल्याचे पाहायला मिळाले.
या प्रक्रिया दरम्यान नागरिकांच्या मागाराप्रवर्ग महिलाकरिता थेट आरक्षित झालेले प्रभाग क्रमांक 1, 2, 5, 16, 22. 23 झाले आहेत.
अशाप्रकारे, प्रभाग क्र. 24, 14, 19, 1, 2, 5, 16, 22, 23 हे एकूण 9 प्रभाग नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलाकरिता थेट आरक्षित झालेले आहे.
एकूण 27 नागरिकांचा मागासप्रवर्ग जागा आहेत. यापैकी, 14 जागा या नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलांकरिता आरक्षित करावयाचा असून यापैकी 9 जागा या नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलाकरिता थेट आरक्षित झालेले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या दि. 14/11/2025 चे निर्देशानुसार प्रभाग क्रमांक 3.4.6.7.8.9. 10, 11, 12, 13, 15, 17, 18, 20, 21, 25 या एकूण 16 प्रभागामधून नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलांसाठी 5 जागा सोडतीने निश्चित करण्यात आल्या त्यात प्रभाग 20, 10, 18, 15, 13 हे पाच थेट महिलेसाठी आरक्षित झाले.




















