भाजप दहावी नाही, तर दहा वर्ष फेल ; आमदार प्रणिती शिंदेंची अक्कलकोट दौऱ्यात टीका
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ अक्कलकोट तालुक्यातील सभा घेण्यात आल्या.
यावेळी सर्वच गावामध्ये गावकऱ्यांनी उत्साहात, उत्स्फूर्त स्वागत केले.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, आपल्या घरात किंवा आपल्या मित्रा पैकी कुणी दहावी, बारावी फेल झाल्यास अतिशय वाईट वाटते, परंतु सोलापुरात तर भारतीय जनता पक्ष दहा वर्ष फेल झाला आहे, त्याचे सोलापूरकरांनी किती वाईट वाटून घ्यावे, असे सांगतानाच आपल्या भागातील सोडवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार, आपल्याला यावेळी शेतकरी विरोधी सरकारला धडा शिकवायचा आहे. आपण काँग्रेस सोबत रहा, असे आवाहन या प्रसंगी केले.
सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले, ग्रामीण भागात महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. मतदारांचा भक्कम पाठिंबा आणि विश्वास असल्याने विजय साकार होईल, याबाबत शंकाच नाही.
याप्रसंगी अक्कलकोटचे सिद्धार्थ गायकवाड, मल्लिकार्जुन पाटील व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




















