भाजपचा चार टर्म नगरसेवक शिवसेनेत ; श्रीनिवास करली यांनी हाती घेतला धनुष्यबाण
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अनेक राजकीय घडामोडी घडत असून भारतीय जनता पार्टीने यांना आपल्या चार टर्म असलेले नगरसेवक श्रीनिवास करली यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेतला.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा अर्ज भरण्याची मंगळवारी शेवटची तारीख आहे त्यासाठी सोमवारी निवडणूक कार्यालयात प्रचंड लगबग पाहायला मिळाली.
तिकडे असे चित्र असताना दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे चार वेळा नगरसेवक राहिलेले श्रीनिवास करणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्याचे फोटो व्हायरल झाल्याने राजकीय चर्चेला उधाण आले.
विधानसभा निवडणुकीदरम्यान विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात श्रीनिवास करणे आणि काही नगरसेवकांची शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते. तेव्हापासून करली यांच्यावर सुभाष देशमुख नाराज होते, दरम्यान श्रीनिवास करली यांची प्रतिक्रिया विचारली असता आज पर्यंत पक्षासाठी प्रामाणिक काम केले सुभाष देशमुख यांना आपल्या प्रभागातून 14 हजाराचे मताधिक्य दिले त्याचाच महाप्रसाद मला मिळाल्याचे ते म्हणाले.
आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. उमेदवारी बाबत अजून निश्चित नाही सोलापुरातील कोर कमिटीचे प्रमुख उमेदवारी बाबत निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले.





















