Friday, October 17, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बांधवांनो लक्ष द्या ! अण्णाभाऊ साठे महामंडळ देणार थेट एवढे लाख कर्ज

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 March 2025
in solapur
0
बांधवांनो लक्ष द्या ! अण्णाभाऊ साठे महामंडळ देणार थेट एवढे लाख कर्ज
0
SHARES
256
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बांधवांनो लक्ष द्या ! अण्णाभाऊ साठे महामंडळ देणार थेट एवढे लाख कर्ज

सोलापूर दि.28(जिमाका) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील दारिद्रय रेषेखालील गरजू घटकांचा आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने, महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजने अंतर्गत कर्जाची मर्यादा रक्कम रु. 25 हजार वरुन रक्कम रु.1 लाख पर्यंत वाढविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. ए. चव्हाण यांनी केले आहे.

थेट कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा रक्कम रु.1 लाख करण्यात आली असून यामध्ये महामंडळाचा हिस्सा रु.85 हजार (85%), अनुदान रक्कम रु.10 हजार (10%), अर्जदाराचा सहभाग रु.5 हजार (5%) असे एकूण रु. 1 लाख (100%), 3 वर्ष (36 महिने) या कालावधीसाठी द.सा.द.शे.4% व्याज दराप्रमाणे कर्ज रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. सदर योजने अंतर्गत रक्कम रु.1 लाख पर्यंतचे प्रकल्प मर्यादपर्यंत असलेले लघु उदयोग करता येतील.
थेट कर्ज योजना (रक्कम रु.1 लाख) राबविणेकरिता जिल्हा निहाय उद्दिष्ट, अटी शर्ती नियम निकष व पात्रतेसह परिपत्रक प्राप्त झाले आहे.

उद्दिष्ट वितरण :- सदर योजनेत साधारणपणे पुरुष 50% व महिला 50% आरक्षण राहील.
ग्रामिण भागासाठी प्राधान्य राहील, राज्यस्तरावरील क्रिडा पुरस्कार व्यक्तीना प्राध्यान राहील, सैन्य दलातील वीरगती प्राप्त वारसाच्या घरातील एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यात येईल.

* सदर योजनेच्या पात्रता व निकष :- अर्जदार मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा जातीतील असावा, अर्जदार महाराष्ट्रातील रहीवाशी असावा, अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे, अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु.3 लाख (तीन लाख) यापेक्षा जास्त नसावे, एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल, अर्जदाराने अर्जासोबत आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा, अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव/प्रशिक्षीत असावा, अर्जदाराचा Cibil Credit Score 500 च्या वर असावा.

* कर्ज मागणी अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे व दस्तऐवज खालीलप्रमाणे.:- जातीचा दाखला (सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा), अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (रु.3 लाख पर्यंत), नुकतेच काढलेले फोटो (दोन), अर्जदाराचा शैक्षणिक पुरावा/शाळेचा दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे, त्या जागा उपलब्धेचा पुरावा (भाडे पावती, करारपत्र), व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र व अनुभव दाखला, यापूर्वी शासकीय कर्ज योजनेचा व अनुदानाचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र अॅफोडेण्टीसह, शॉप अॅक्ट/ग्रामसेवकाचे व्यवसाय करण्यास ना हरकत दाखला, कोटेशन (व्यवसाया संदर्भात साहित्य/भाल खरेदीचे दरपत्रक), अर्जदारास महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे प्रमाणपत्रे/करारपत्रे कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

कर्ज प्रक्रिया :- कर्ज प्रकरण कार्यालयाकडे प्राप्त झाल्यास, परिपूर्ण असे कर्ज प्रस्ताव लाभार्थीच्या निवडीसाठी, प्रथम लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेसाठी व मंजूरीस्तव सादर करण्यात येतील, प्राप्त झालेले कर्ज प्रस्तावाची संख्या उदिष्टांपेक्षा जास्त असल्यास, लाभार्थीची निवड चिठ्ठीव्दारे (लॉटरी पध्दतीने) करण्यात येईल,

अर्जदाराच्या Cibil Credit Score 500 च्या वर आहे किंवा कसे याबाबत कर्ज मंजूर झाल्यानंतर अहवालसादर करावा लागेल, कर्ज मंजूरीची प्रक्रिया झाल्यानंतर कर्ज प्रकरणी कर्ज वसुलीसाठी दोन सक्षम जामिनदार घेण्यात येतील, (01)- जामिनदार-शासकीय/निमशासकीय नोकरदार/अनुदानीत संस्था मधील कर्मचारी असावा, त्यांचे कार्यालयाकडून वसुलीसाठी हमीपत्र प्यावे लागेल. (जामिनदार कागदपत्रे-रु.100 बॉन्डबर प्रतिज्ञापत्र, कार्यालयाचे ओळखपत्र, मागील 03 महिन्याचे पगार पत्रक, मागील 06 महिने बैंक स्टेटमेंट पासबुक झेरॉक्स, आधारकार्ड, पॅन कार्ड, रेशनकार्ड झेरॉक्स, 02 फोटो.इ.), जामिनदार- मालमत्ताधारक जमीनदार असावा, त्यांचे मालमत्तेवर महामंडळाच्या नावे कर्जाचा बोजा नोंद करावा लागेल. (जामिनदार कागदपत्रे 7/12किंवा 8-अ उत्तारा, आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅन कार्ड, रु.100 बॉन्डवर प्रतिज्ञापत्र व इ.), सहभाग रक्कमेपोटी रु.5 हजार चा धनाकर्ष महामंडळाचे नावे जमा करावा लागेल, कर्ज वितरणापुर्वी लाभार्थीकडून वसुलीपोटी 20 उत्तर दिनांकित धनादेश घेण्यात येतील, कर्जदाराच्या वारसाचे रु.100 च्या बॉन्डवर वारसदार म्हणून प्रतिज्ञापत्र, इतर वैद्यानिक दस्ताऐवनांची पुर्तता करणे बंधनकारक आहे, 3 वर्ष (36 महिने) कालावधीसाठी द.सा.द.शे.4% व्याज दराने कर्ज रक्कम वितरीत केली जाईल.

जिल्हा कार्यालय सोलापूर मार्फत थेट कर्ज योजनेमध्ये कर्ज मागणी अर्ज वितरण दिनांक 1 मार्च 2025 ते दिनांक 15 मार्च 2025 पर्यंत करण्यात येणार असून व कागदपत्रांच्या पुर्ततेसह दिनांक 1 मार्च 2025 ते दिनांक 15 मार्च 2025 रोजी पर्यंत अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही करण्यात येणार आहेत.
तरी इच्छुक मांग, मातंग, मिनी-मादीग, मादीग, दानखणों मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील गरजू व होतकरुनी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेव आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे, बोग बजार समोर, सोलापूर येथे मूळ जातीचा दाखला, आधारकार्ड व इतर कागदपत्रासह स्वतः उपस्थित रहावे, त्र्यस्थांकडे अर्ज दिला जाणार नाही किंवा अर्ज स्विकारला जाणार, या करिता कार्यालयात स्वतः प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे. असे आवाहन श्री आर.एव चव्हाण, जिल्हा व्यवस्थापक आर. ए. चव्हाण यांनी केले आहे.

Tags: अण्णाभाऊ साठे
SendShareTweetSend
Previous Post

अरे बाबा ! सालार यांचा अजिदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश ; पक्षाची ताकद मुस्लिम समाजात वाढविणार

Next Post

सोलापुरात कोयत्याने वार ; “आमच्या मंडळाची मीटिंग सोडून तू रावण साम्राज्याच्या मिटींगला का गेलास”

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात कोयत्याने वार ; “आमच्या मंडळाची मीटिंग सोडून तू रावण साम्राज्याच्या मिटींगला का गेलास”

सोलापुरात कोयत्याने वार ; "आमच्या मंडळाची मीटिंग सोडून तू रावण साम्राज्याच्या मिटींगला का गेलास"

ताज्या बातम्या

सोलापुरात कार्यक्रमाला उपस्थिती अन् मुंबईमध्ये घेतला प्रवेश ; विजय देशमुख यांच्या विरोधात उघड प्रचार करणारे पुन्हा भाजपमध्ये

सोलापुरात कार्यक्रमाला उपस्थिती अन् मुंबईमध्ये घेतला प्रवेश ; विजय देशमुख यांच्या विरोधात उघड प्रचार करणारे पुन्हा भाजपमध्ये

17 October 2025
सोलापुरात काँग्रेसने भाजप कार्यालयासमोर फेकले भोपळे, भेट दिल्या मिरच्या

सोलापुरात काँग्रेसने भाजप कार्यालयासमोर फेकले भोपळे, भेट दिल्या मिरच्या

16 October 2025
सोलापूरच्या मध्य मंडल अध्यक्षांनी सत्कारऐवजी पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला धनादेश

सोलापूरच्या मध्य मंडल अध्यक्षांनी सत्कारऐवजी पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला धनादेश

16 October 2025
पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांचे मुख्यमंत्र्यांनी केले विशेष कौतुक ; पहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांचे मुख्यमंत्र्यांनी केले विशेष कौतुक ; पहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

15 October 2025
दिलीप माने -काका साठे पुन्हा एकत्र येणार? बीबीदारफळ काका साठे, नान्नज अविनाश मार्तंडे तर कोंडीतून पृथ्वीराज माने यांची चर्चा

दिलीप माने -काका साठे पुन्हा एकत्र येणार? बीबीदारफळ काका साठे, नान्नज अविनाश मार्तंडे तर कोंडीतून पृथ्वीराज माने यांची चर्चा

15 October 2025
सोलापुरात भाजपने काँग्रेसचे प्रभाग फोडले ; बाबा मिस्त्री तौफिक शेख यांना आणले आमने-सामने

सोलापुरात भाजपने काँग्रेसचे प्रभाग फोडले ; बाबा मिस्त्री तौफिक शेख यांना आणले आमने-सामने

14 October 2025
अभिषेक कदम खूनप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या तालुकाध्यक्षास जामीन

जन्मठेप शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयात जामीन मंजुर

14 October 2025
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पॅटर्न आता राज्यभरात लागू होणार

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पॅटर्न आता राज्यभरात लागू होणार

14 October 2025

क्राईम

अभिषेक कदम खूनप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या तालुकाध्यक्षास जामीन

जन्मठेप शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयात जामीन मंजुर

by प्रशांत कटारे
14 October 2025
0

जन्मठेप शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयात जामीन मंजुर सारोळे ता. बार्शी येथे पत्नी मिनाक्षी साबळे हिचा खुन केल्याच्या आरोपावरुन जन्मठेप...

सोलापूर जिल्ह्यात मंडल अधिकाऱ्याला चाळीस हजाराची लाच घेताना पकडले

सोलापूर जिल्ह्यात मंडल अधिकाऱ्याला चाळीस हजाराची लाच घेताना पकडले

by प्रशांत कटारे
9 October 2025
0

सोलापूर जिल्ह्यात मंडल अधिकाऱ्याला चाळीस हजाराची लाच घेताना पकडले तलाठ्याने घेतलेली नोंद फेटाळली असल्याचे सांगत पुन्हा नोंद मंजूर करण्यासाठी पन्नास...

सोलापुरात ‘शाहरुख’चा हातात सत्तूर घेऊन धिंगाणा ; “तेरे को खत्म करता नही तो मेरू को कुच करके तेरो को गुताता”

सोलापुरात ‘शाहरुख’चा हातात सत्तूर घेऊन धिंगाणा ; “तेरे को खत्म करता नही तो मेरू को कुच करके तेरो को गुताता”

by प्रशांत कटारे
8 October 2025
0

सोलापुरात 'शाहरुख'चा हातात सत्तूर घेऊन धिंगाणा ; "तेरे को खत्म करता नही तो मेरू को कुच करके तेरो को गुताता"...

“ये तो साला एक दिन होना ही था ” ; पोलिसांनी वेळीच ऍक्शन घेतली असती तर…. ; चर्चा रंगली

“ये तो साला एक दिन होना ही था ” ; पोलिसांनी वेळीच ऍक्शन घेतली असती तर…. ; चर्चा रंगली

by प्रशांत कटारे
4 October 2025
0

"ये तो साला एक दिन होना ही था " ; पोलिसांनी वेळीच ऍक्शन घेतली असती तर.... ; चर्चा रंगली सोलापूर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Sep    

Our Visitor

1900422
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group