सोलापूरला पुण्याच्या धरणातून पाणी मिळणार नाही ; अजित पवारांनी यांच्यावर फोडलं खापर, हे तर माझ्या रक्तात नाही.. का असे म्हणाले
सोलापूर : सोलापूरचे उजनी धरण सध्या वजा 6 टक्क्यांवर पोहोचले आहे, पाण्याचे नियोजन करण्यात आणि काटकसरीने पाणी वापरणे गरजेचे असताना ते झाली नाही. त्याला कालवा सल्लागार समिती जबाबदार असून येणाऱ्या काळात सोलापूरला पिण्याचे पाणी पुरेल इतके उजनी धरणात असल्याने पुण्याच्या धरणातून सोलापूरला पाणी देणे शक्य नाही असे स्पष्ट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले.
नियोजन भवनात आढावा बैठक घेतल्यानंतर अजित पवार हे पत्रकारांशी बोलत होते. पुण्यात अनेक धरण आहेत, पण पुण्याची लोकसंख्या पाहता त्या धरणातील पाणी या परिस्थितीत काटकसरीने पुरवले जाते त्यामुळे पुण्यातील धरणाचे पाणी सोलापूरला देणे शक्य नाही. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने समांतर जलवाहीनीचे काम सुरू आहे. त्याचा कमी पडणारा 90 कोटीचा निधी तातडीने मंजूर केला आहे. येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीत उजनी धरणातून दुबार तीबार पंपिंग करावी लागणार आहे त्यासाठीही 3 कोटी 40 लाख निधी देण्याच्या सूचना मी केल्या आहेत. त्यामुळे सोलापूरला आवश्यक पिण्याचे पाणी कमी पडणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोलापूरचे अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलवले यावर पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले,
स्वतः अक्कलकोट आमदारांशी संपर्क साधला, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. दोन वेगवेगळे आणि छोटे केंद्र मंजूर झाले होते, त्यातील एक बारामतीला घेतले. माझ्या रक्तात नाही, स्वभावात नाही, माझ्याकडे राज्याच्या अर्थ विभाग आहे, मी कोणताही विचार करू शकतो, तो जीआर करताना,चूक झाले असेल तर मी रद्द करतो.