जिल्हा परिषदेच्या बांधकाम कार्यकारी अभियंत्याला नोटीस ; मार्च एंडपूर्वी सीईओ ॲक्शन मोडवर ; झेडपीचे ते गेट ही उघडले !
सोलापूर : मार्च एंड आणि लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या ॲक्शन मोडवर आल्या असून ज्या विभागाचे कामकाज अतिशय संत गतीने सुरू आहे अशा विभाग प्रमुखांना त्यांनी नोटिसा काढल्या आहेत.
त्यामध्ये बांधकाम विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांना नोटीस काढण्यात आली आहे त्यांच्या विभागाचा खर्च केवळ 37% असल्याचे निदर्शनास आले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या अंतर्गत बांधकाम विभाग येतो त्यामुळे कोहीनकर यांचे या विभागाकडे दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे काही दिवसांपूर्वी जॉईन झालेले कार्यकारी अभियंता संतोष गाडेकर यांचेही काम समाधानकारक नसल्याचे दिसून येत आहे. सीईओ आव्हाळे यांनी या विभागाच्या कामाची झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात आले. गाडेकर यांची ही दांडी लवकरच उडेल असेही जिल्हा परिषदेमध्ये बोलले जात आहे.
जिल्हा परिषदेमधून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जाण्यासाठी जिल्हा परिषदेचे महात्मा फुले प्रवेशद्वार मागील काही दिवसांपासून बंद होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे वाहन या भागातून ये जा करत असल्याने आणि त्या भागात इतर नागरिक वाहने लावत असल्याने खबरदारी म्हणून ते प्रवेशद्वार काही काळ बंद ठेवण्यात आले होते. दरम्यानच्या काळात लोकशासन पार्टीच्या वतीने हे प्रवेशद्वार उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी हे प्रवेशद्वार उघडल्याचे पाहायला मिळाले.