Thursday, July 31, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकट मुलाखतीचे प्रमुख आकर्षण ; डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेचे राज्य अधिवेशन २९ जानेवारी रोजी कोल्हापूर सिद्धगिरी कणेरीमठात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 January 2024
in maharashtra
0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकट मुलाखतीचे प्रमुख आकर्षण ; डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेचे राज्य अधिवेशन २९ जानेवारी रोजी कोल्हापूर सिद्धगिरी कणेरीमठात
0
SHARES
150
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकट मुलाखतीचे प्रमुख आकर्षण ; डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेचे राज्य अधिवेशन २९ जानेवारी रोजी कोल्हापूर सिद्धगिरी कणेरीमठात

कोल्हापूर : डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना महाराष्ट्राचं दुसरे अधिवेशन दिनांक २८ आणि २९ जानेवारी रोजी कोल्हापूरच्या सिद्धगिरी कणेरीमठ येथे होत आहे. २९ जानेवारी रोजी सकाळच्या क्षेत्रातील अधिवेशनाचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांचे शुभहस्ते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत होणार आहे. तसेच महाराष्ट्र महागौरव व डिजीटल स्टार महागौरव पुरस्कार २०२४ वितरण केले जाणार आहे. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीनिवास पाटील, आयुष्यमान भारत-मिशन महाराष्ट्र समितीचे डॉ. ओमप्रकाश शेटे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्विकारले आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ संपादक-पत्रकार राजा माने यानी मंगळवारी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुहास पाटील,राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के, शहर अध्यक्ष प्रशांत चुयेकर, सचिव धीरज रुकडे, सोलापूर शहर अध्यक्ष प्रशांत कटारे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष विजय कोरे आदी उपस्थित होते.

डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना ही देशातील इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडियातील सर्वांत मोठी संघटना आहे. महाराष्ट्रासह देशभरातील ५ हजार ५०० डिजिटल चॅनेल, न्यूज वेब पोर्टल, प्रिंट मीडिया मधील संपादक, पत्रकार यांचा समावेश आहे. या डिजिटल मीडियाला मोठ्या प्रमाणात जगभरातुन प्रतिसाद मिळत आहे. या मीडियाला केंद्र आणि राज्य शासनाकडून मान्यता मिळावी, तसेच डिजिटल मीडियाच्या संपादक-पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनेच्या वतीने पाठपुरावा केला जात आहे. या संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन देशातील पहिले पुस्तकांचे गाव भिलार-महाबळेश्वर याठिकाणी झाले. दुसरे अधिवेशन कोल्हापुरातील सिद्धगिरी कणेरीमठ येथे दिनांक २८ आणि २९ जानेवारी रोजी होत आहे.सिध्दगिरी कणेरी मठाने सहकार्य केले आहे. अधिवेशन निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील डिजिटल मीडियातील सुमारे २ हजारहून अधिक संपादक पत्रकार एकत्र येत आहेत. अधिवेशनाच्या मुख्य दिवशी म्हणजे २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कणेरी मठ येथील भव्य सभागृहात अधिवेशनाचा शुभारंभ श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता अधिवेशनाचा मुख्य समारोप महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रकट मुलाखतीने होणार आहे. ही मुलाखत ख्यातनाम सिने लेखक, निमार्ता, दिग्दर्शक व अभिनेते गिरीश कुलकणी (वळू आणि देऊळबंद फेम) घेणार आहेत. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते *माध्यम क्षेत्रातील डिजिटल मीडियाचे महत्त्व* या संग्राह्य स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे.

दुसऱ्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभाग व संघटनेच्या संयुक्त विद्यमाने *‘कृत्रिम बुध्दीमत्ता आणि माध्यम*’ या विषयावर परिसंवाद ठेवला आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी विद्यापीठ पत्रकारिता विभागाच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. निशा मुडे-पवार, सायबर कॉलेजचे डॉ. राजेंद्र पारिजात, सकाळ माध्यम समुहाचे समुह संपादक सम्राट फडणीस, दैनिक पुढारी चे डिजिटल एडिटर मोहसीन मुल्ला, सोलापूर विद्यापीठ जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलीकर आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या आदर्श व्यक्तिंचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. त्यामध्ये पुरस्कार प्राप्त मान्यवर सौ. वर्षाताई तुळशीदास लांजेवार (चंद्रपुर-महिला शेती चळवळीच्या प्रणेत्या), प्रा. शिवराज मोटेगावकर(लातुर-शिक्षण तज्ज्ञ), तुकाराम व सौ. रागिणी कंदकुरे (छत्रपती संभाजीनगर-उद्योग क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी), विकास थोरात (सातारा-प्रकल्पग्रस्तांना मोबदला प्रश्नांवर लढा), सौ. विद्याताई गुलाबराव पोळ (कोल्हापूर-ग्रामीण भागातील शिक्षणाच्या प्रसार कार्यात महत्वूपर्ण योगदान), डॉ. प्रियाताई शिंदे व डॉ. अरुणाताई बर्गे (सातारा-आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य. कणेरी मठ चळवळीत सक्रीय सहभाग), डॉ. भारती चव्हाण (पुणे-मुलाच्या नावापुढे आईचे नाव लावण्याची चळवळ), प्रवीण माळी (सांगली-आर्किटेक्ट शास्त्रात विशेष योगदान), शशिकांत धोत्रे (सोलापूर-जागतिक किर्तीचे पेन्सिल चित्रकार), विशाल परब (सिंधुदूर्ग-यशस्वी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते), डॉ. राहुल शिवाजीराव कदम (पुणे-साखर उद्योग आणि समाजकार्यात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी), प्रकाश औंताडे (सांगली-कृषि उत्पन्न वाढीत विशेष उल्लेखनीय कामगिरी), नंदिनी गायकवाड (पुणे-अंबिका मसाले यशस्वी उद्योजक), डिजीटल स्टार महागौरव पुरस्कारप्राप्त मान्यवर : कृष्णराज महाडिक (कोल्हापूर-डिजिटल माध्यमात नवा इतिहास), संजय श्रीधर कांबळे (पुणे-डिजीटल क्षेत्रात दिशादर्शक कार्य), नागनाथ सुतार (पंढरपूर-उच्च तंत्रकौशल्याला बातमी मूल्यांची जोड) आदींचा समावेश आहे. अधिवेशनाला उपस्थित राहणाºया राज्यातील पत्रकारांची भोजनाची व निवास्थानाची सोय कणेरी मठ याठिकाणी करण्यात आली आहे.

अधिवेशनास कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार श्रीनिवास पाटील, आयुष्यमान भारत-मिशन महाराष्ट्र समितीचे डॉ. ओमप्रकाश शेटे, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे, आमदार श्रीमती जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार जयंत आसगावकर, माजी खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार के. पी. पाटील, आ. चंद्रदीप नरके, आ. संजयसिंह घाटगे, आ. सत्यजित पाटील-सुरुडकर, आ. संजिवनीदेवी गायकवाड, आ. राजू आवळे, आ. भरमू सुबराव पाटील, आ. मालोजीराजे छत्रपती, आ. सुरेश हाळवणकर, आ. अमल महाडिक, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, शाहु ग्रुपचे समरजितसिंह घाटगे, संताजी घोरपडे कारखान्याचे चेअरमन नवद मुश्रीफ, पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील, अमरसिंह पाटील-कोडोली, मानसिंग गायकवाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम फुलारे, शिवाजी विद्यापीठ कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे या प्रमुख मान्यवरांसह प्रमुख संस्थांचे चेअरमन, सर्व राजकीय, सामाजिक पक्षांचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Tags: Digital media sampadak patrakar sanghatanaRaja maneSolapur News
SendShareTweetSend
Previous Post

महाराष्ट्रात ही आता युपी पॅटर्न ; राम मंदीर उत्सव रॅलीवर हल्ला करणाऱ्या परिसरात ‘बुल्डोजर बाबा’

Next Post

सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे अडचणीत ; काय आहे प्रकरण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे अडचणीत ; काय आहे प्रकरण

सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे अडचणीत ; काय आहे प्रकरण

ताज्या बातम्या

सोलापुरात राष्ट्रवादीची अनोखी स्पर्धा ; ‘महापौरांकडून अपेक्षा ‘ लिहा आणि व्यक्त व्हा

सोलापुरात राष्ट्रवादीची अनोखी स्पर्धा ; ‘महापौरांकडून अपेक्षा ‘ लिहा आणि व्यक्त व्हा

30 July 2025
काँग्रेसकडून सोलापूर जिल्ह्यासाठी लिंगायत चेहरा ; साहेबांचा समर्थक झाला जिल्हाध्यक्ष

काँग्रेसकडून सोलापूर जिल्ह्यासाठी लिंगायत चेहरा ; साहेबांचा समर्थक झाला जिल्हाध्यक्ष

30 July 2025
भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसचे प्रत्युत्तर ; चेतन नरोटे यांनी देवेंद्र कोठे यांचे सगळेच काढले !

भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसचे प्रत्युत्तर ; चेतन नरोटे यांनी देवेंद्र कोठे यांचे सगळेच काढले !

30 July 2025
खासदार प्रणिती शिंदे यांचे ते वक्तव्य ; आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांच्या वतीने मागितली माफी

खासदार प्रणिती शिंदे यांचे ते वक्तव्य ; आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांच्या वतीने मागितली माफी

29 July 2025
मंडल अध्यक्षांनी दिलेला सपत्नीक वारीतील फोटो फ्रेम पाहून जयाभाऊ भारावले !

मंडल अध्यक्षांनी दिलेला सपत्नीक वारीतील फोटो फ्रेम पाहून जयाभाऊ भारावले !

29 July 2025
जिल्हा परिषद कास्ट्राईब संघटनेने घेतली पालकमंत्र्यांची भेट ; जयकुमार गोरेंनी मागण्या घेतल्या ऐकून

जिल्हा परिषद कास्ट्राईब संघटनेने घेतली पालकमंत्र्यांची भेट ; जयकुमार गोरेंनी मागण्या घेतल्या ऐकून

29 July 2025
ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख यांना मातृशोक

ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख यांना मातृशोक

29 July 2025
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ‘सिंहासन’ला सदिच्छा भेट ; सुपरफास्ट बातम्यांचे केले कौतुक

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ‘सिंहासन’ला सदिच्छा भेट ; सुपरफास्ट बातम्यांचे केले कौतुक

29 July 2025

क्राईम

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई

by प्रशांत कटारे
26 July 2025
0

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई सोलापूरचे पोलीस आयुक्त राजकुमार यांनी एक मोठी कारवाई करताना...

धक्कादायक ! हॉटेल सुगरणचे मालक वाघमोडे व चालक वाघचवरे ठार ; आयशर आणि ओमनी कारचा भीषण अपघात, झाला

धक्कादायक ! हॉटेल सुगरणचे मालक वाघमोडे व चालक वाघचवरे ठार ; आयशर आणि ओमनी कारचा भीषण अपघात, झाला

by प्रशांत कटारे
22 July 2025
0

धक्कादायक ! हॉटेल सुगरणचे मालक वाघमोडे व चालक वाघचवरे ठार ; आयशर आणि ओमनी कारचा भीषण अपघात, झाला सोलापूर :...

सोलापुरात पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल ; पती वकील असल्याची माहिती

सोलापुरात पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल ; पती वकील असल्याची माहिती

by प्रशांत कटारे
18 July 2025
0

सोलापुरात पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल ; पती वकील असल्याची माहिती सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली...

काय ! आमिर खान खून खटला ; आरोपीस उच्च न्यायालयात जामीन

काय ! आमिर खान खून खटला ; आरोपीस उच्च न्यायालयात जामीन

by प्रशांत कटारे
11 July 2025
0

काय ! आमिर खान खून खटला ; आरोपीस उच्च न्यायालयात जामीन सोलापूर : विजापूर नाका मशीद जवळ दि.१६.०२.२०२३ रोजी आमिर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Our Visitor

1828935
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group