सोलापूर मध्यचे आमदार प्रणिती शिंदे याच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण तालुक्यातील नेते सुरेश हसापुरे यांच्या चाणक्य बुध्दीने दिनांक 5 डिसेबर ते 14 डिसेंबर पर्यंत 20 ओवरच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा भंडारी मैदानावर माजी गृहराज्य मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होऊन सुरुवात झालेले होते तद्नंतर दररोज दोन टीम खेळत आज गुरुवार रोजी अंतिम फायनलला दिपक सी. सी. विरुद्ध मॉडेल क्रिकेट अकादमी याच्यात सामना होऊन मॉडेल क्रिकेट अकादमी या संघाने 51000 चे बक्षीस माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष चेतन नरोटे, हरीश पाटील, सिधदुअणणा पाटील, माजी नगरसेवक विनोद भोसले, शिवा बाटलीवाला, मोतीलाल राठोड, श्रीशैल रणधिरे, मधुकर आठवले, सुभाष पाटोळे, जयकुमार पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे गणेश डोंगरे व सुदर्शन हसापुरे यानी नेटके नियोजन केले. पहिल्यांदाच लेदर बॉलची स्पर्धा व एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षीसे ठेवण्यात आल्यामुळे तरुण वर्गात आणि जुळे सोलापूराकरानी स्वागत केले.
दोन नंबरचा बक्षिस दिपक सी सी यांना मिळाले. या स्पर्धेमुळे हद्दवाढ भागात बॅनर्स, पोस्टर्स, ताई चषक, कबड्डी स्पर्धा, चादर साड्या वाटप अनेक कार्यक्रम सोलापूर व ग्रामीण भागात जोरदार केल्यामुळे युवक वर्गात आणि लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसला वातावरण अनुकूल झाल्याचे दिसुन आले.
प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हसापुरे यानी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्यामुळे येणाऱ्या विधानसभेला दक्षिण तालुक्यातुन तेच उमेदवार राहतील अशी पण चर्चा रंगली आहे. एकदंरीत आजपर्यंत असे कोणी आमदार ताईंचा वाढदिवस झाला नव्हता. ते लोकसभेच्या तोंडावर झाल्यामुळे हसापुरे यांचे कौतुक होत आहे.
ही चाललेली स्पर्धा 25000 हजार लोकांनी ऑनलाईन बघितली. नागपूर अधिवेशनाला जातानाच आमदार प्रणिती शिंदे यानी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छां व्यक्त केल्या होत्या.
नागपूर येथील अधिवेशनात आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या अनेक मुद्द्यावर म्हणजेच अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापूरात ठेवा, सिव्हील हॉस्पिटल मधील सीटी स्कॅन मशिन व एम आर आय..चालु करण्याबाबत 100 बेड हॉस्पिटल चालु करण्याबाबत, पोलीस भरती व नियुक्ती यासह कष्टकरी कामगार महिला व युवक संबधित विषयावर बाजी मारली तर इकडे भंडारी मैदानावर हसापुरे यानी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम घेऊन मैदान गाजवले.