राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या व्हिजनला साथ दिली आहे. देशाचा विकास केवळ नरेंद्र मोदीच करू शकतात हे या निकालावरून जनतेने दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोककल्याणकारी अनेक योजना राबवल्या आहेत त्यामुळेच येथील जनतेने त्यांना भरभरून यश दिले आहे.
शहरात, जिल्ह्यात राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत असल्यावर विकास होऊ शकतो त्यामुळेच येथील जनतेने भाजपला निवडून दिले आहे. त्याबद्दल तेथील जनतेचे शतशः आभार. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच भाजप आपली विजयी घोडदौड सुरू ठेवेल.
नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कोणीही कसलीही आघाडी केली तरी त्याचा कोणताही फरक पडणार नाही हे आता सिद्ध झाले आहे. जनतेच्या बळावर सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी प्रचंड बहुमताने पुन्हा एकदा पंतप्रधान निश्चित होतील अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी निकालानंतर दिली.