Friday, August 8, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर सीईओ दिलीप स्वामी यांची बदली ; सर्व स्तरातून आल्या या प्रतिक्रिया

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 July 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 


सोलापूर जिल्हा परिषदेचे उपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची पावणे तीन वर्षानंतर बदली झाली. त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात राबवलेल्या उपक्रमांची कायम चर्चा होत राहणार आहे. त्यांच्या बदलीमुळे अनेकांची मने नाराज झाली. काहींनी त्यांना या बदलीनंतर प्रतिक्रिया पाठवले आहेत त्या काय प्रतिक्रिया आहेत वाचा खालील प्रमाणे…..

साहेब आपल्यासारखे अधिकारी आता दुर्मिळ झालेले आहेत आपली काम करण्याची दिशा खरोखरच आम्हाला मार्गदर्शक आहे. आपल्या मार्गदर्शनामुळे शिक्षण क्षेत्रात खरोखरच क्रांती निर्माण झालेली आहे. स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रम, सायकल बँक उपक्रम शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन, आमच्यासाठी अनमोल होते. आपण कुठेही गेला तरी आम्ही तुम्हाला आश्वासित करतो की आपल्या मार्गदर्शनानुसारच आमची वाटचाल येथून पुढे चालू राहील. शेवटपर्यंत एक सायकल बहिणीसाठी उपक्रमचालू ठेवू.आपणास पुढील सेवेसाठी आभाळभर शुभेच्छा. परंतु मायेचा हात नेहमी आमच्या पाठीशी असावा हीच अपेक्षा .🙏🙏🙏🙏🙏 मारुती लिगाडे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पंढरपूर


आदरणीय सर , आपली बदली झालेचे समजले आणि मन सुंन्न झाले … 

    आपण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना नक्कीच सोलापूर जिल्ह्याला राज्यातच नव्हे तर देशात एक वेगळी ओळख निर्माण करून दिलीत… 

                    कोरोना काळात आपण राबविलेले विविध उपक्रम , स्वच्छ शाळा -सुंदर शाळा उपक्रम यासारखे अनेक उपक्रम हे समाजाच्या उपयोगी पडणारे व राज्याला दिशादर्शक असे राहिले  ….

       आपली प्रत्येक कार्यशाळा , आपले प्रत्येक स्पीच आमच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण करणारे होते ….

    आपल्या मार्गदर्शनाखाली खूप काही शिकायला मिळाले … 

     आपले दशसूत्री , सायकल बँक , गुणवत्ता वाढीसाठीचे विविध उपक्रम आम्ही यापुढेही अविरत चालू ठेवू ….

लवकरच आपली पुणे विभागातच किंवा पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती व्हावी ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏


सर,

आपल्या सहवासात आम्ही घडलो. खूप काही शिकलो. आपले प्रशासकीय कौशल्य, नेतृत्व गुण, मेहनती स्वभाव, वक्तृत्व, रसिकता, गुणग्राहकता आणि साधेपणा,  सर्वसामान्यांमध्ये  मिसळण्याची वृत्ती हे विशेष गुण आम्हाला जवळून अनुभवता आले. 

साहेब, आपण वेळोवेळी सोपवलेली कामे, दाखवलेला विश्वास व दिलेले प्रोत्साहन यामधून काही छोट्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी आम्हाला मिळाली, तो खरं म्हणजे आमचाही अल्पसा व्यक्तिमत्व विकासच होता.

सर, आपला कार्यकाळ प्रेरणादायी होता. तो सदैव स्मरणात राहील.

आपली उपक्रमशीलता व आरोग्य निरंतर राहावे. आपणास दीर्घायुष्य लाभावे आणि भावी जीवनात आपला कायम उत्कर्ष होत राहावा हीच सदिच्छा ! 

😊🙏


आदरणीय सर

आपण राबविलेले उपक्रम हे गोरगरिबांसाठी निश्चितच फलदायी आहेत.आपले बरेचसे उपक्रम राज्याने घेतले हेच आपल्या कारकिर्दीचे गमक आहे.आपले हे आम्हां सर्वांच्या चिरंतन लक्षात राहिल.आम्हांला आपण दिशा,नेमकेपना ,सुस्पष्टता  ह्याचीही जाणीव करुन दिली.आपण घेतलेल्या कार्यशाळा, मुलींच्या शिक्षणाला चालणा देणारा सायकल बँक सारख्या उपक्रमाच चळवळीत रुपांतर होणार आहे.हे आम्ही कदापिही विसरणार नाही.आपणाला कामाचा भरपूर ताण असताना शिक्षण विभागाला निश्चितच जादा वेळ दिला.याची जानीव सर्वांना आहे.आपण शिक्षण आयुक्त म्हणून भविष्यकाळात याव हीच सदिच्छा 🙏🌷


आदरणीय सर, आपल्या कार्यकिर्द मध्ये आपण राबविलेले प्रत्येक अभियान हे लोकाभिमुख, जनतेच्या मनात शासकीय कर्मचारी यांचे विषयी आदरभाव निर्माण करणारे, जनतेच्या गरजा पुर्ण करणारे,गरजु लोकांना शासकीय योजनांचा वेळेत लाभ मिळवून देणारे, सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कामगिरीस न्याय देणारे, प्रत्येक विषयास वेगळपण देणारे असे होते. त्यामूळे शासनास ही सर्व अभियानाची दखल घ्यावी लागली. आपण राबविलेले काही अभियान परत राज्य सरकारने राज्यभर राबविली जसे की “माझे मुल- माझी जबाबदारी” ( जागरूक पालक -सुदृढ बालक अभियान).आपणामुळे सोलापूर जिल्हाची एक वेगळी ओळख  निर्माण झाली. या अभियानामध्ये आम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली काम केले त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. सर,आपणास पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा…✍️👍🙏🏻😊


मा. आदरणिय साहेब 

तुमची बदली झाली हे कितीही खरे असले तरी आम्हाला अजून स्वप्नवत वाटत आहे.कारण केवळ आणि केवळ आपणामूळे  शिक्षण विभाग कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.मा.CEO हे शिक्षण विभागाचेच आहेत की काय असे वाटावे इतके आपले  सूक्ष्म नियोजन व लक्ष शिक्षण विभागाकडे होते.अनेक कठीण प्रसंगी व‌ संकटकाळी तूम्ही ठामपणे शिक्षण विभागाच्या पाठीशी उभे होतात.आपण शिक्षण विभागाचे आधारस्तंभ  होतात व आहात

आपण शिक्षण विभागात  दशसूत्री, स्वच्छ शाळा सूंदर शाळा,महिला सक्षमीकरण,सायकल बँक,माझे विद्यार्थी माझी जबाबदारी, गीतमंच हे व अनेक महत्वाचे उपक्रम असे राबवले की शासनालाही त्या उपक्रमांची दखल घ्यावी लागली.

 उच्च पदस्थ असूनही आम्हाला आपली भीती कधीही वाटली नाही उलट आधारच वाटला.आपण आपल्या कार्यकाळात फक्त आधारच दिला नाही तर सर्वांना  सन्मानजनक वागणूकही दिली.

 शिक्षणविभागातील शिक्षकांपासून शिक्षणाधिकाऱ्यां पर्यंत सर्वच घटकांशी आपले‌ असलेले वैयक्तिक पातळीवरही जबरदस्त बाँडीग होते.

 शिक्षण विभागात राबवलेले उपक्रम पाहता अजून अनेक उपक्रम राबवण्यास आता मिळणार नाही याची खंत आम्हाला जितकी वाटत आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त आपणास वाटत असणार आहे.

 *बदली झाली म्हणून आपूलकीचे, आपलेपणाचे नाते कमी करण्याची गरज नाही*  या ओळी थेट अंतर्मनाला भिडणार्‍या आहेत.

 अधिकारी कसे नसावेत याची अनेक उदाहरणे आम्ही पाहिली आहेत.पण अधिकारी कसे असावेत याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपण आमच्यासमोर आदर्श आहात साहेब.

 आपल्या पूढील वाटचालीस शिक्षणविभागाकडून आदर व सन्मानासहित खुप खुप शुभेच्छा साहेब.🙏🏻🙏🏻💐💐


आदरणीय सर, रात्रंदिवस विकासाचा ध्यास घेऊन सेवाकार्यात स्वतःला झोकून देऊन कार्य करण्याची वृत्ती, सामाजिक व शैक्षणिक विकासाची तळमळ आणि येणाऱ्या सर्व समस्यांवर अतिशय कल्पकतेने मार्ग काढण्याचे कौशल्य, कधी कठोर होऊन तर कधी प्रेमाने सर्वांना बरोबर घेऊन नेहमी यशस्वीतेकडे वाटचाल करणारे आपले नेतृत्व आम्हाला लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो आपली स्वतःची आणि जिल्ह्याची एक वेगळी ओळख आपण निर्माण केलीत . अनेक वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून कुठेही न डगमगता अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आपण यशाची शिखरे पादाक्रांत केलीत आपल्या या दैदिप्यमान कार्याची दखल सर्व माध्यमाना आणि केवळ राज्य स्तरावरच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरही घ्यावी लागली . निश्चितच आपले प्रेरणादायी  व्यक्तीमत्व आणि प्रेरणादायी विचार आम्हाला सतत प्रेरणा देत राहतील . आपल्या पुढील कार्यास आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏 – डॉ . रामचंद्र कोरडे, प्राचार्य, डाएट सोलापूर


साहेब आपल्यामुळे कोरोना कालावधीत लाखो लोकांचे, जीव वाचले, माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझी शाळा माझी जबाबदारी माझे गाव माझी जबाबदारी अशा अनेक मोहिमेमुळे लाखो मुलांचे जीव वाचले आरोग्य तपासणी पासुन  ते दशसुत्री, मुळे आपल्या अनेक उपक्रमांना शासनाला स्वीकारावं लागले, आम्ही धन्य धन्य झालो आपल्या कार्य कर्तुत्वाने, आपण प्रमोशन ने जरी जात असेल तरी आपल्यासाठी मोठी जागा निश्चित मिळणार अशी आशा करतो आपण आमचे स्वामी समर्थ आहात, आपले आशीर्वाद, आमच्या पाठीशी आहेत, आम्ही आणखी जोमाने काम करू, आम्हाला शाबासकी, वेळ प्रसंगी रागावणे हेही हवे आहे,

 *आपल्या कार्याला हजार तोफांची* *सलामी*

SendShareTweetSend
Previous Post

नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व आमदार सुभाष देशमुखांची ट्यूनिंग जुळणार ; कुमार यांनी दिले या विषयांना प्राधान्य

Next Post

मनिषा आव्हाळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या महिला सीईओ ; पहिल्या सीईओची राहिली केवळ चार महिने कारकीर्द ; आव्हाळे यांच्या समोर हे आव्हान

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मनिषा आव्हाळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या महिला सीईओ ; पहिल्या सीईओची राहिली केवळ चार महिने कारकीर्द ; आव्हाळे यांच्या समोर हे आव्हान

ताज्या बातम्या

इम्तियाज जलील यांना खुश करण्यासाठी शौकत पठाण यांचा नवा फंडा

इम्तियाज जलील यांना खुश करण्यासाठी शौकत पठाण यांचा नवा फंडा

7 August 2025
नियोजन विभागाकडून सोलापुरात झालेल्या कामांच्या तपासण्या ; नियोजन उपायुक्त सोलापूर दौऱ्यावर

नियोजन विभागाकडून सोलापुरात झालेल्या कामांच्या तपासण्या ; नियोजन उपायुक्त सोलापूर दौऱ्यावर

7 August 2025
‘विठ्ठल व मुबारक’ या दोन शिक्षक मित्रांनी शेकडो शेतकऱ्यांसाठी काढला मार्ग ; पाण्याला वाट करून दिली

‘विठ्ठल व मुबारक’ या दोन शिक्षक मित्रांनी शेकडो शेतकऱ्यांसाठी काढला मार्ग ; पाण्याला वाट करून दिली

7 August 2025
सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार

6 August 2025
खासदार प्रणिती शिंदे आहेत संपर्कात ; उत्तराखंड ढगफुटीवर काय दिली माहिती वाचा

खासदार प्रणिती शिंदे आहेत संपर्कात ; उत्तराखंड ढगफुटीवर काय दिली माहिती वाचा

6 August 2025
ब्रेकिंग : सोलापूरचे चार पर्यटक अडकले उत्तराखंडमध्ये ; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

ब्रेकिंग : सोलापूरचे चार पर्यटक अडकले उत्तराखंडमध्ये ; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

6 August 2025
प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांच्या आरोग्य विभागाला सक्त सूचना ; थेट धाडी टाका

प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांच्या आरोग्य विभागाला सक्त सूचना ; थेट धाडी टाका

6 August 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रांच्या धोरणाबाबत सुधारित आराखडा तयार करा ; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रांच्या धोरणाबाबत सुधारित आराखडा तयार करा ; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

6 August 2025

क्राईम

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार

by प्रशांत कटारे
6 August 2025
0

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार सोलापूरच्या पोलिसांनी मोठा दणका दिला असून गोवंशय जनावरांच्या कत्तली करणाऱ्या माजी नगरसेवक...

पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की ; अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील प्रकार ; गुन्हे दाखल

पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की ; अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील प्रकार ; गुन्हे दाखल

by प्रशांत कटारे
5 August 2025
0

पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की ; अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील प्रकार ; गुन्हे दाखल सोलापूर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती...

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई

by प्रशांत कटारे
26 July 2025
0

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई सोलापूरचे पोलीस आयुक्त राजकुमार यांनी एक मोठी कारवाई करताना...

धक्कादायक ! हॉटेल सुगरणचे मालक वाघमोडे व चालक वाघचवरे ठार ; आयशर आणि ओमनी कारचा भीषण अपघात, झाला

धक्कादायक ! हॉटेल सुगरणचे मालक वाघमोडे व चालक वाघचवरे ठार ; आयशर आणि ओमनी कारचा भीषण अपघात, झाला

by प्रशांत कटारे
22 July 2025
0

धक्कादायक ! हॉटेल सुगरणचे मालक वाघमोडे व चालक वाघचवरे ठार ; आयशर आणि ओमनी कारचा भीषण अपघात, झाला सोलापूर :...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2025
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Jul    

Our Visitor

1838696
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group