सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तब्बल सात महिन्यानंतर चंद्रपूरच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील या शुक्रवारी जॉईन झाल्या.
सकाळी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांची भेट घेतली, आव्हाळे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचीही पाटील यांनी भेट घेत शुभेच्छा स्वीकारल्या.
आपल्या दालनात त्यांनी जाऊन कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली आणि पदभार स्वीकारला. यापूर्वी त्या पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालक होत्या. त्या कार्यालयातील प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी आपल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह येऊन स्वागत केले. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने विवेक लिंगराज यांनी आपले सहकारी व महीला कर्मचारी संघटनेसह येऊन सत्कार केला. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी नूतन उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचे स्वागत केले.