सोलापूर (प्रतिनिधी) सध्या पावसाचे दोन महिने उलटले तरी आपणाकडे अपेक्षित पाऊस नाही मात्र इतर राज्यात भागात अतिवृष्टीचा कहर आहे. निसर्गाचा हा बदल सतत जाणवत असून उपलब्ध पाण्याचे योग्य जतन करणे भविष्यातील गरज असल्याचे माजी आमदार दिलीपराव माने यांनी सांगून गौरव समितीने खेळाडू, महिला, विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या उपक्रमाची कौतुक केले.
माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव समितीने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी सौ.जयश्री माने,माजी नगरसेवक नागेश ताकमोगे, भारत जाधव,श्रीकांत मोरे,पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे,शिवाजी बचुटे,सिद्राम खेडगीकर,डॉ. वेलनकर,शैलजा राठोड,अँड.बापु देशमुख,पांडुरंग चौधरी,हाजीमलंग नदाफ,आण्णाराव भोपळे,लताताई जावीर,अंतु देठे,शाम पाटील,सचीन चौधरी,श्रीकांत मेलगे पाटील, महेश घाडगे,अनिल हिबारे, प्रदीप सुरवसे, राजु बगाडे,आदि उपस्थित होते.
गौरव समितीने यावेळी क्रिकेट खेळाडूसाठी आयपीएल धर्तीवर क्रिकेट स्पर्धा, महिलांसाठी पाककला विडी महिला कामगारांसाठी विडी वळणे स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, तर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून निरोगी जीवनाला गती दिल्याचे माने यांनी सांगून सामाजिक विधायक उपक्रमाचे कौतुक केले
या मॅरेथॉन स्पर्धेत 7125 स्पर्धक सहभागी झाले.14 वर्षाखालील 3075, 17 वर्षाखालील 2700 खुला गटात स्पर्धकांनी 1350 भाग घेतला. यावेळी के.एल.ई. पासून स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन प्रकाश काशीद,दशरथ गुरव,अनिल पाटील,राजु प्याटी, दिपक शिंदे,संजय घोडके,राजु लामकाने,यांनी केले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पृथ्वीराज माने युवा मंच,दिलीपराव माने विचार मंच,डी.एम.ग्रुप पदाधिकारी, कार्यकर्ते, परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.
▪️क्षणचित्रे
मँरेथाँन स्पर्धेत स्पर्धकांना नागरीक टाळ्या वाजवून भाग मिल्का भाग म्हणून प्रोत्साहन देत होते
▪️डॉ. सचीन नरोटे व नर्मदा हाँस्पीटल यांनी खरचटलेल्या स्पर्धकावर उपचार केले.तर माने यांनी
तब्येतेची विचारपूस केली
▪️स्पर्धेदरम्यान रस्त्यावर कुठेही वहानधारक व नागरीकांना त्रास होणार नाही याची काळजी संयोजकांनी घेतली. व पडलेल्या रिकाम्या बाटल्या,कागद स्वयंसेवकानी डस्टबीन मध्ये जमा केले.
▪️स्पर्धा निकाल▪️
▪️14 वर्षाखालील मुली गट
प्रथम-रिया सुनील चव्हाण
व्दितीय-रिया महेश शिंदे
तृतीय-अशिका प्रविण देशमुख
उत्तेजनार्थ-श्रद्धा बिरूदेव सरवदे
▪️14वर्षाखालील मुले गट
प्रथम-रोहन कलप्पा चव्हाण
व्दितीय-मेघराज धानम्मा हिरेमठ
तृतीय-समर्थ श्रीनिवास धाकपाडे
उत्तेजनार्थ-ओम शिवशिंग चव्हाण
▪️17 वर्षाखालील मुली
प्रथम-साक्षी श्रीशैल व्हनमाने
व्दितीय-स्नेहा निकम राजमाने
तृतीय-मयुरी सिध्दराम स्वामी
उत्तेजनार्थ-अस्मिता हिराचंद काळे
▪️17वर्षाखालील मुले
प्रथम-गणेश उमेश चव्हाण
व्दितीय-प्रतिक राजाराम मोहिते
तृतीय-रोहित मारुती व्होरडे
▪️खुला गट-मुली
प्रथम-अर्चना श्रीशैल व्हनमाने
व्दितीय-स्नेहा मल्लीनाथ निंबर्गी
तृतीय-सादीया अ.करीम मुल्ला
उत्तेजनार्थ-गौरी तुकाराम कासवीर
▪️खुला गट पुरुष
प्रथम-रोहन लालासो.तारके
व्दितीय-आशिष.नारायण ठोंबरे
तृतीय-सुमीत अविनाश जावीर
उत्तेजनार्थ-गणेश भिमराव कुंभार