सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांच्या दोन वर्षाच्या शिक्षेला दिली स्थगिती देऊन मोदी सरकारला चपराक दिली. राहुल गांधीना सुप्रिम कोर्टातून न्याय मिळाला असुन गांधी यांची खासदारकी सुद्धा पुन्हा मिळणार आहे. जनतेचा आवाज संसदेत बुलंद करणार आहेत. सत्याचा विजय झाल्याबद्दल सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी पुतळा रेल्वे स्टेशन येथे सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने लाडू जिलेबी वाटून व फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले, सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा राहुल गांधी यांच्या बाजूने लागला असून एक प्रकारे हुकूमशाहा मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाने चपराक दिली आहे. हा विजय न्यायदेवतेचा असून त्याचे आम्ही स्वागत करतो. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही.
यावेळी प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश,लोंढे, प्रवीण वाले, सुशीलकुमार म्हेत्रे, युवराज जाधव, दाऊद नदाफ, शुभम माने, धीरज खंदारे, महेंद्र शिंदे, आशुतोष वाले, प्रतीक शिंगे, चेतन जंगम, गोपाळ शिंगे, किरण राठोड, सुरज कांबळे, बबलू जाधव, गणेश म्हेत्रे, यासीन शेख, राजू नाईक, दिनेश डोंगरे, अजय जाधव, सचिन गायकवाड, शुभम राऊत, शरद वाघमोडे, आप्पाजी गायकवाड, महेश भंडारे, योगेश खैराटे, बशीर शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.