दिवाळी सण व त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीतील सर्व धर्मातील सण हे स्नेह, आनंद, आपुलकी व एकमेकाविषयी काळजी घेणारे सण असून त्याच अनुषंगाने आज जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने घेतलेला हा सर्व धर्मीय स्नेह फराळ कार्यक्रम हे त्याचे प्रतीक आहे असे प्रतिपादन जिल्हा कोषागार अधिकारी सर्फराज मोमीन यांनी मेळाव्याचे उद्घाटन करताना प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना ईशादिन शेळकंदे यांनी गोड फराळ दीपावली सणाचा आनंदाचा व समृद्धीचे प्रतीक असून त्यामध्ये सर्वांना सामावून घेऊन केल्याने तो वृद्धिंगत होऊन दिवाळी सण हा सर्वांचा आहे अशी भावना या कार्यक्रमातून दिसून येते.
या प्रसंगी कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे व विस्तार अधिकारी आरोग्य महेबूब निटोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने सालाबादप्रमाणे सर्वधर्मीय प्रामुख्याने मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध धर्मीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी फराळ स्नेह मेळाव्याचे दिप प्रज्वलित करून यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते.
या प्रसंगी उपकोषागार अधिकारी वसीम बागवान, राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर , लेखा कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष उमाकांत राजगुरू, बहुजन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अप्पाराव गायकवाड, आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव समीर शेख, वाहन चालक संघटनेचे सचिव शहानवाज शेख, मैलमजूर संघटनेचे जाफर शेख,कोषागार संघटनेचे श्रीकांत होसमनी उपस्थित होते.
या कार्यक्रमात कोषागार अधिकारी व त्यांच्या सहकारी यांनी दिवाळी सणानिमित्त सण अग्रीम व वेतन तातडीने केल्याबद्दल युनियनच्या वतीने मोमीन, बागवान, होसमनी यांचा सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष तजमुल मुतवली, सूत्रसंचालन डॉ. एस. पी. माने तर आभार प्रदर्शन समीर शेख यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला अध्यक्ष अनुपमा पडवळे ,निर्मला राठोड , रीमा पवार आरती माढेकर,सविता काळे,अश्विनी दोरकर, स्वाती स्वामी,श्रीशैल देशमुख , बसवराज दिंडोरे,विलास मसलकर ,संतोष शिंदे ,राकेश सोडी, विशाल घोगरे, चेतन भोसले ,शांताबाई जाधव , सुवर्णा कोरके ,श्रीमती बनसोडे, सिद्धमा म्हेत्रे, वर्षा औधूर्ती, आदींनी परिश्रम घेतले.
सर्व कर्मचाऱ्यांना ताटा भोवती रंगीत रांगोळी , दिप,आकाश कंदील अशा दिवाळीच्या प्रतीकासोबत फराळाचे आस्वाद देण्यात आले. सदरचा कार्यक्रम करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाळे यांचे ‘नो प्लास्टिक’ संकल्पनेचे पूर्णतः पालन महिला कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले.
आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व महिलांनी स्वतः घरी तयार केलेले फराळ या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिल्याने कार्यक्रमाचा गोडवा अधिक वाढला. कार्यक्रमास जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील वरील धर्मीय कर्मचारी उपस्थित होते.