पंढरपूर येथे धनगर समाज आरक्षण अंमलबजावणीसाठी पंढरपूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आ. गोपीचंद पडळकर यांच्या आवाहनानुसार संपूर्ण राज्यभर धनगर समाजाने प्रत्येक तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
पंढरपूर तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी एकत्र येत निवेदन दिले व आरक्षणाचा पहिला टप्पा असून पुढील काळात शासनाला जाग आणण्यासाठी उग्र आंदोलन होईल सरकारने धनगर समाज ST आरक्षण अंमलबजावणी 50 दिवसात करतो असे चोंडी येथील उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घ्यावे असे लेखी पत्र महाराष्ट्र शासनाने देऊनही पुन्हा धनगर समाजाची फसवणूक करून भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे.
यावेळी माऊली हळणवर म्हणाले, सरकारने तातडीने धनगर आरक्षणाचे अंमलबजावणी करावी अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती सरकारला गंभीर परिणामास सामोरे जावे लागेल असा इशारा दिला
यावेळी प्रा सुभाष मस्के, दादासाहेब मोटे, नारायण देशमुख, सोमनाथ ढोणे, प्रशांत घोडके, प्रसाद कोळेकर, सुजाता वगरे, आण्णासो सलगर, रमेश हाके, विष्णु सुळे, नागनाथ सातपुते, बालाजी बनसोडे यांच्यासह सकल धनगर समाज, पंढरपूर तालुका व शहरातील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.