राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत शहर व ग्रामीण तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण येथील विविध विभागातील कार्यरत असणारे वैदयकीय अधिकारी व कर्मचारी यांचे राज्यस्तरावर बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे. त्याला पाठींबा देण्यासाठी सोलापूर शहर व ग्रामीण सर्व जिल्हास्तरीय प्रा.आ.केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रूग्णालय येथील “राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत विविध विभागातील तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण सर्व अधिकारी कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करत आहेत. मागील 25 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे मात्र अद्यापही त्यावर तोडगा निघालेला नाही.
राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत विविध विभागातील तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण अधिकारी कर्मचारी गेल्या २० ते २५ वर्षापासून तुटपुंजा मानधनावर काम करत असून कोरोना काळात याच कर्मचा-यांनी घरदार जीवाची परवा न करता आपले कर्तव्ये चोख पणे बजावले आहे. शासन सेवा समायोजन करावे अशी त्याची मागणी असून मुंबई येथील आझाद मैदानावर पार पडलेल्या आक्रोश मोर्चामध्ये आरोग्य मंत्र्यानी दिलेले आश्वासन लेखी स्वरुपात प्राप्त होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचे पावित्रा त्यांनी घेतला आहे. ज्याप्रमाणे इतर राज्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत विविध विभागातील तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण कंत्राटी कर्मचा-यांचे समायोजन केली आहे. त्याच पध्दतीने राज्य शासनाने देखिल लवकरात लवकर समायोजन करण्याचा निर्णय घ्यावा. अशी मागणी करण्यात येत आहे. या कामबंद आंदोलनाचा फटका रुग्णसेवेबर होत आहे.
दरम्यान सोलापुरातील आरोग्य सेविकांनी आक्रोश करताना सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. आम्ही मागील 25 दिवसांपासून आंदोलन करत आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, “आम्ही असा काय गुन्हा केला आहे की तुम्ही आमची दखल घेत नाहीत, पोलीस पाटलांचे मानधन तुम्ही तातडीने वाढवला मग आमच्याकडे दुर्लक्ष का? असा सवाल केलाय.