सोलापुरात भाजपला धक्का ; सुरेश पाटलांनी घेतला हाती धनुष्यबाण
सोलापूर : महापालिका निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोलापुरातून मोठी राजकीय घडामोडी समोर आले असून भारतीय जनता पार्टीचे कट्टर आणि एकनिष्ठ मानले जाणारे माजी सभागृह नेते ,माजी स्थायी समिती सभापती माजी विरोधी पक्ष नेते सुरेश पाटील यांनी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.
प्रभाग क्रमांक तीन मधून पाटील यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि माजी जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे निवडणूक कार्यालयात दाखल झाले. यावेळी सुरेश पाटील यांना फॉर्म दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी अधिकृत माहिती दिली.
सोमवारीच भाजपचे चार टर्म नगरसेवक राहिलेले श्रीनिवास करली यांनी सुद्धा धनुष्यबाण हाती घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुरेश पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश करत माती धनुष्यबाण घेतला आहे.
शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यपद्धतीला कंटाळलेल्या सुरेश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उघडपणे दिवंगत नेते महेश कोठे यांच्या उतारे चा प्रचार केला होता.
त्याचाच फटका सुरेश पाटलांना बसल्याचे बोलले जाते परंतु देवेंद्र कोणते यांच्या उपस्थितीत यश पाटील यांनी पुन्हा भाजप जॉईन केला होता पण नाराज विजयकुमार देशमुख यांनी पक्षावर दबाव टाकून आपली खेळी यशस्वी केली.



















