काँग्रेसकडून उमेदवारी खेचून घेण्यात अरिफ शेख यशस्वी ; चेहऱ्यावर आले तेज
सोलापूर : यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदाच बॅकफूटवर गेलेला काँग्रेस पक्षाकडून आपल्याला अपेक्षित उमेदवारी खेचून घेण्यात काँग्रेसचे माजी महापौर आरिफ शेख हे यशस्वी झाल्याचे दिसून आले.
सध्या प्रभाग क्रमांक पंधरा कडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्या प्रभागातून काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे निवडणूक लढवत आहेत यापूर्वीच या प्रभागातील तीन सहकारी नगरसेवक हे भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे आता या पॅनल मध्ये कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
पॅनलची घोषणा करताना चेतन नरोटे यांच्यासह सर्वसाधारण महिलेतून माजी महापौर आरिफ शेख यांची कन्या तसेच अनुसूचित जाती महिलेतून बसवराज म्हेत्रे याच्या सून यांची घोषणा झाली होती पण व्यवहारे आणि आरिफ शेख यांच्या मुलीने माघार घेतल्याने पुन्हा काँग्रेसची गोची झाली.
शेवटी आता या प्रभागातून सर्वसाधारण प्रवर्गातून आरिफ शेख यांनी उमेदवारी खेचून घेतली आहे तसेच काँग्रेसने अनुसूचित जाती महिला उमेदवार बदलला असून त्या जागी सपना अलगोड या उमेदवार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हे चारही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आरिफ शेख पॅनल मध्ये आल्याने आता हे पॅनल मजबूत झाल्याचे बोलले जात आहे




















