सोलापुरात फारुख शाब्दींची NCP कडे इतक्या जागेची डिमांड? आज होणार फायनल
सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच आपल्या एमआयएम पक्षाच्या शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देणाऱ्या फारूक शाब्दि यांच्या भूमिकेकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.
अनेक इच्छुक समर्थक त्यांच्यासोबत असून फारुख भाई सांगतील तो पक्ष अशी त्यांची भूमिका आहे परंतु महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवार आज शेवटचा दिवस असल्याने आजच्या दिवस मध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फारूक शाब्दि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आकर्षित झाले असून त्यांनी आपल्या काही ठराविक समर्थ कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादीकडे किमान दहा जागेची डिमांड केल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी दिवसभरात शाब्दि यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूरच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्याचे सुद्धा समोर आले आहे.
शाब्दि यांची नजर 16, 20, 14 आणि 22 या चार प्रभागांवर असून या चार प्रभागातून किमान दहा जागा हा ते मागत असल्याचे सांगण्यात आले. या चार प्रभागातील अनेक मुस्लिम नेते शाब्दी यांच्या या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत त्यानंतरच दुपारी काहीजण निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.





















