किसन जाधव यांचा यु टर्न ; पुन्हा राष्ट्रवादीत? दत्तात्रय भरणे मामांची घेतली भेट
सोलापूर : काही दिवसांपूर्वी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये मध्यरात्री प्रवेश केलेले माजी गटनेते किसन जाधव हे पुन्हा दादांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची माहिती मिळत असून तशा हालचालींना वेग आला आहे.
सोमवारी भरणेवाडी येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट किसन जाधव यांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. किसन जाधव सोग्रही प्रज्ञासाठी स्वतः भरणे मामा हे किसन जाधव यांना घेऊन सोलापूरला आल्याचे सुद्धा समजते. हॉटेल बालाजी सरोवर येथे त्याबाबत मीटिंग सुरू असल्याची माहिती मिळाली.
प्रभाग क्रमांक 22 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून किसान जाधव हे निवडणूक लढवणार आहेत त्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता परंतु या प्रभागात भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर पक्षाला वेगळा विचार करावा लागल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे पुढे होणारी आपली अडचण ओळखून किसन जाधव यांनी पुन्हा सोग्रही परतण्याचा निर्णय घेतल्याचे चर्चा रंगली आहे.




















