ब्रेकिंग : शरद पवार समर्थक मनोहर सपाटे सुनील तटकरेंच्या भेटीला ; फोटो व्हायरल
सोलापूर : एका वादग्रस्त व्हिडिओमुळे अडचणीत सापडलेले शरदचंद्र पवार गटाचे माजी महापौर मनोहर सपाटे यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्याचे दिसून आले. तसा त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना नमस्कार घालतानाचा मनोहर सपाटे यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मनोहर सपाटे यांचा 2017 च्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग क्रमांक सात मधून पराभव केला होता. एका महिलेसोबतचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सपाटे यांना त्या वेळचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पक्षातून तडकाफडकी निलंबित केले होते.
हे प्रकरण निवळल्यानंतर मराठा समाजसेवा मंडळाची निवडणूक झाली. त्यामध्ये सपाटे यांनी निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. सर्व संचालकांना घेऊन सपाटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.
दरम्यान आता एकूणच राजकीय परिस्थिती बदललेली राजकीय समीकरणे पाहता सपाटे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे का असा प्रश्न दिलेल्या फोटोवरून उपस्थित केला जात आहे.




















