सुभाष देशमुखांसोबत बैठक अन् लगेच दिलीप माने सोबत जेवण ! मालकांच्या भाजप प्रवेशाचे पालकमंत्र्यांनी काय ठरवले !
सोलापूर : राज्यातील महापालिका निवडणुका जाहीर होण्याच्या दिवशीच सोलापुरात भारतीय जनता पार्टीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ केला.
महापालिकेत झालेल्या एका कार्यक्रमानंतर बैठकीला दक्षिणचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख हे जयकुमार गोरे यांच्या सोबत होते त्यानंतर पत्रकार परिषदेच्या वेळी सुद्धा बापू सोबत दिसले.
याच वेळी पत्रकारांनी महापालिका निवडणुकी संदर्भात पालकमंत्र्यांना विचारले असता माझ्या नेतृत्वाखाली कोणतीही निवडणूक होणार नाही. शहरातील तीनही आमदार सक्षम आहेत त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक पार पडेल असे सांगत दिलीप माने यांच्या भाजप प्रवेश बाबत छेडल्यानंतर त्याचा निर्णय सुभाष देशमुख घेतील असे सांगून पालकमंत्र्यांनी पत्रकारांसमोरच गुगली टाकली.
महापालिकेकडून पालकमंत्र्यांचा ताफा शासकीय विश्राम घराकडे रवाना झाला. त्या ठिकाणी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महिला अध्यक्ष चाकोते यांच्यासोबत पालकमंत्री यांनी दिलीप माने यांना आपल्या शेजारी बसवून दुपारचे जेवण केले.
पालकमंत्री महाबळेश्वर कडे रवाना झाल्यानंतर बंद खोलीत दिलीप माने यांनी बंधू जयकुमार माने, माजी नगरसेवक नागेश ताकमोगे, बाजार समिती संचालक प्रथमेश पाटील या समर्थकांसह आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याशी बराच वेळ चर्चा केल्याचे दिसून आले.
माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सुभाष देशमुख आणि त्यांच्या समर्थकांकडून कडून विरोध झाल्यानंतर दिलीप माने यांचा प्रवेश थांबला आहे परंतु महापालिका इलेक्शन दरम्यान हा प्रवेश होण्याची शक्यता एकूणच या घडामोडीनंतर नाकारता येत नाही.




















