काय हे प्रथमेश ! अण्णांचा एकही विश्वासू कार्यकर्ता दिसत नाही ; ज्येष्ठ निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजी
माजी महापौर स्व महेश अण्णा कोठे यांच्या गटाने प्रथमेश कोठे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यामुळे स्वर्गीय महेश कोठे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे कारण या कोणालाही प्रथमेश यांनी विश्वासात घेतले नसल्याचे बोलले जात आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात हा प्रवेशा सोहळा पार पडला.
माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेविका कुमुद अंकाराम, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, माजी नगरसेवक शशिकांत कैंची, जोशी समाज शहर अध्यक्ष युवराज सरवदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय वाकसे, राष्ट्रवादी युवकचे शहर उत्तर सरचिटणीस तुषार पवार, संतोष सोमा, आकाश भोसले आदींचा भाजपा प्रवेश संपन्न झाला.
या प्रवेशाचे सध्या सोलापूर मध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी प्रयाग कुंभमेळ्या दरम्यान शाही स्नान करताना माजी महापौर तथा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मध्ये प्रचंड असे वातावरण असताना महेश कोठे यांचा पराभव झाला. महेश कोठे यांच्यासाठी शहर उत्तर मध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या जिवाचे रान केले होते. पण दुर्दैव या ठिकाणी भाजपचा विजय झाला. पण शहर उत्तर मध्ये अण्णांना मानणारे अनेक कार्यकर्ते आहेत त्यामध्ये मुस्लिम मागासवर्गीय यांच्यासह इतर समाज आहे.
अनेक दिवसापासून निर्णय घेण्यासाठी प्रतीक्षेत असणाऱ्या प्रथमेश यांनी अखेर वातावरण पाहून आमदार आणि आपले चुलत बंधू देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पण काही ठराविक कार्यकर्त्यांना सोबतच घेऊन त्यांनी प्रवेश केला अण्णांचे कट्टर आणि विश्वासू समर्थकांना या प्रवेशा संदर्भात काहीही माहिती झाले नाही. या प्रवेशानंतर त्यांच्या मधून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आमचा या प्रवेशाला विरोध नव्हता परंतु प्रथमेश यांनी आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होते अशी भावना सध्या व्यक्त होत आहे.






















