धक्कादायक ! हॉटेल सुगरणचे मालक
वाघमोडे व चालक वाघचवरे ठार ; आयशर आणि ओमनी कारचा भीषण अपघात, झाला
सोलापूर : सोलापूर पुणे महामार्गावरील कोंडी नजीक असलेल्या राहुटी येथे झालेल्या विचित्र अपघातात मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथील हॉटेल सुगरणचे मालक रवींद्र सुभाष वाघमोडे व त्यांच्या ओमनी गाडीचा चालक अनिल दत्तात्रेय वाघचवरे हे ठार झाले आहेत.
याबाबत हकीकत अशी की, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर ट्रकचा ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन ओमनी कारला जोरदार धडकला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातात कोळेगाव येथील सुगरण हॉटेलचे मालक रवींद्र सुभाष वाघमोडे (वय 51, रा. कोळेगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर) आणि त्यांच्यासोबत असलेले चालक अनिल दत्तात्रय वाघचवरे (वय 35, रा. भांबेवाडी, ता. मोहोळ) यांना गंभीर दुखापत झाली. दोघांना तातडीने सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील तपास तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने सुरू आहे.