याला म्हणतात सोलापूरवरील प्रेम ; शहराशी जोडलेली नाळ कायम ; अधिकारी असावा तर असा
सोलापूर : अधिकारी येतात आणि जातात. परंतु काही ठराविक अधिकाऱ्यांचीच त्या शहराशी नाळ जोडलेली आहे. त्या शहरात केलेले काम, आठवणी, ते कायम स्मरणात ठेवतात. सोलापुरात अनेक अधिकारी आले आणि गेले. पण मोजकेच सोलापूरकरांच्या आठवणीत राहिलेले आहेत. त्यापैकी एक अधिकारी म्हणजे तत्कालीन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने.
सोलापुरात आरटीओ म्हणून काम करताना त्यांच्याकडे महानगरपालिकेच्या परिवहन व्यवस्थापकाची जबाबदारी आली आणि त्यांनी असे काम केले की सगळ्या सोलापूरकरांच्या आठवणीत ते काम राहिले. त्याकाळी परिवहन विभागाला त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवले होते. शहरात तब्बल 100 बस रस्त्यावर पाहायला मिळत होत्या.
परिवहन व्यवस्थापकाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी आपल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा पुरेपूर फायदा महानगरपालिकेला करून दिला.
राजेंद्र मदने हे मूळ पुणे जिल्ह्यातील. त्यांनी शासकीय सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. बऱ्याच दिवसानंतर ते शुक्रवारी सोलापूर आले होते. काही पत्रकारांच्या त्यांनी भेटी घेतल्या. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
सोलापुरात आल्यावर त्यांनी सात रस्ता येथील बस डेपोला आवर्जून भेट दिली. त्या ठिकाणी जुन्या कर्मचाऱ्यांची संवाद साधला. साहेब आल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील सुद्धा आनंद पाहण्यासारखा होता. परिवहनच्या बस समोर ते नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले.