जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी आरोग्य विभागाचा विविध विषयाचा आढावा घेताला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ.संतोष नवले,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील,जिल्हा माता व प्रजनन अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे,क्षयरोग अधिकारी,डॉ.मिनाक्षी बनसोडे,सहाय़यक जिल्हा आरोग्य अधिकारी,बिरुदेव दुधभाते,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत कुलकर्णी,तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधिक्षक,सर्व कार्यक्रम समन्वयक (राष्ट्रीय आरोग्य अभियान ) तसेच जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत सर्वप्रथम आपण जनतेचे सेवक आहोत, जनतेला आरोग्य सेवा देणे हे आद्य कर्तव्य आहे याचा विसर न पाडता मुख्यालयात उपस्थित राहून सेवा देणे, सर्व अधिकारी कर्मचारी यांना बंधनकारक आहे.जे कोणी मुख्यालयात राहत नसतील व सेवा देण्यास हजगर्जीपणा असल्याचे निदर्शनास आलेस कारवाई करण्याचे निर्देश मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे टिमने कुष्टरोग कार्यक्रमात सुधारणा केलेबददल कौतुक तर इतर कामातदेखील सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
१.कुटुंबकल्याण कार्यक्रम अंतर्गत सर्व ओ.टी. कार्यान्वित करण्यात यावे. तसेच दोन अपत्यांमधील अंतर वाढविणेकरिता शासनस्तरावरुन ज्या उपाययोजना आहेत त्यांचे जनजागरण करावे.
२.प्रा.आ.केंद्र,उपकेंद्र.आर.एच.एस.डी.एच च्या ठिकाणी पुरेसा औषधसाठा असलेबाबत प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधिकारी,वैद्यकीय अधिक्षक,यांनी खात्री करणे. तसेच त्या-त्या ठिकाणचे औषधनिर्माण अधिकारी यांनी औषधसाठा नोंदवहीत तसेच ऑनलाईन अहवालात अद्ययावत माहिती दररोज भरणेत यावी.
३.जिल्हास्तरावरुन Surprise Visit वाढविणेत यावेत. या भेटींमध्ये आरोग्यसंस्थेतील स्वच्छता,कर्मचाऱ्यांची उपस्थिती,देत असलेल्या सेवा, नोंदवहींचे अद्ययावतीकरण पाहून त्यावर आपला शेरा नमूद करणेत यावा. यानंतर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे Surprise Visit होणार आहेत. त्यावेळी या सर्व बाबी तपासणेत येतील.
४.ऑक्सिजन सिलेंडर साठा उपलब्धतेबाबत,माहिती अद्ययावत ठेवावी काही कमतरता असलेस वरिष्ठांशी याबाबत समन्वय साधावे .१०२,१०८,गाडीची संदर्भसेवा ,याबाबत माहिती विचारणेत आली.
५. आरोग्य संस्थांमध्ये ओ.पी.डी सेवेकरिता वैद्यकीय अधिकारी यांनीच उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तसेच एकाच वैद्यकीय अधिकारी वा इतर स्टाफ यांचे २४ तासांचे डयुटी चार्ट बदलून ८ किंवा १२तास डयुटी करावे. जेणेकरुन अत्यावश्यक सेवा देताना कोणत्याही प्रकारचा विलंब अथवा निष्काळजीपणा होणार नाही.
६. टि.बी.निर्मूलन कार्यक्रम,काम वाढवावे व आर.बी.एस.के. टीममार्फत जी शाळा,अंगणवाडी तपासणी करुन जी आजारसदृश्य बालके आढळतात, त्यांचे जास्तीत जास्त तपासणी होऊन विविध सर्जरीचा गरीब बालकाना मोफत लाभ देण्यात येईल याची तत्परतेने काळजी घेऊन काम वाढवावे. तसेच Mental Health Programme च्या अनुषंगाने शाळा,महाविद्ययालये,विविध संस्थांमध्ये ,गावातदेखील सपुदेशन करण्यात यावे. याबाबत ऑनलाईनदेखील सदर सेवेचा लाभ घेता येतो,याबाबत जनजागरण करावे,तर निश्चितच तणावग्रस्त लोकांचे जीव वाचवण्यात यश येईल.असे अवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.