दिलीप माने यांचा एल्गार ; 29 तारखेला उमेदवारी भरणार ; एक दक्षिण नाही तर जिल्ह्यात अकरा ठिकाणी उमेदवार उभे करणार
आता आपण निर्णय घ्यायची वेळ आली आहे. येत्या 29 तारखेला फार्म भरून ठेवणार असे सांगत एक दक्षिणच नाही आता जिल्ह्यात सगळीकडे उमेदवार उभे करणार असा एल्गार काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी केला.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांना काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्या सुमित्रा या निवासस्थानासमोर ठेवी आंदोलन केले आपल्या भावना व्यक्त केल्या या भावनेचा आदर करून दिलीप माने यांनी सर्वांशी संवाद साधला.
ते म्हणाले , लोकसभा निवडणुकीपासून विधानसभेच्या तयारीला लागलो, काँग्रेसचा प्रचार केला, रात्र दिवस राबलो, शिंदे साहेबांचा झालेला पराभव ताईच्या रुपात बदला घेतला. त्यांनतर मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा झाला, उदंड प्रतिसाद होता. सगळे सर्व्हे करून घेतले, गल्ली ते दिल्लीचा सर्व्हे झाला एकात ही आपण मागे नव्हतो, आपल्या मित्र पक्षांचा सर्व्हे झाला का माहिती नाही, मग कोणत्या पक्षाचा सर्व्हे स्वीकारला, आम्ही काय करायचे आयुष्यभर बंडखोरी करायची का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.
2019 ला दुसऱ्या पक्षात गेलो होतो पण मी तिथे रमलो नाही, तुम्ही सर्व्हे प्रमाणे जावा ही माझी मागणी आहे. दिलीप माने यांना उमेदवारी मिळाली तर येणारी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती काँग्रेसकडे येणार हा माझा विश्वास आहे.
आपल्या मित्र पक्षाला जागा दिली ती जागा निवडून येणार असे वाटते का?
सत्तेचा आपणाला किती त्रास द्यायचा, अनेक प्रकरणात कोर्टापर्यंत आपण गेलो आहे. जिल्ह्यातला मोठा असलेला सर्वात मोठा तालुका दक्षिण आहे, परत भाजपला आणायचे का? भाजपचा जो उमेदवार तो कसा आहे हे मला माहित आहे, त्यांना मीच लढत देणार.
सोलापूरच्या नेत्यांना विश्वासात न घेता उमेदवारी दिली, जिल्ह्यात अकरा तालुके आहेत, मग बघा मी किती किती वार करेन, सर्व ठिकाणी उमेदवार उभा करेन, आम्हाला फक्त दोनच जागा, हा आमचा अपमान नाही कार्यकर्त्यांचा अपमान आहे.