बाबा मिस्त्री म्हणतात, मी मध्य मध्ये इच्छुक नव्हतोच ; दक्षिण मधून अजूनही इच्छुक
सोलापूर : सोलापूर शहराच्या राजकारणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. आजपर्यंत शहर मध्य मध्ये उमेदवार म्हणून माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांचे नाव येत होते आणि त्यामुळे काँग्रेस पक्षात गोंधळ उडाला त्याच बाबा मिस्त्री यांनी शहर मध्य या मतदारसंघातून नव्हतो आणि आता ही नाही असे जाहीर केले आहे. मात्र दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आपण अजूनही इच्छुक आहोत असेही त्यांनी सांगितले. मग आता मध्य मधून कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या निर्णयामुळे एम आय एम पक्षाला काहीसा दिलासा मिळाला असेल हे नक्की.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या हक्काच्या शहर मध्य या मतदारसंघात काँग्रेसचा पुढचा वारसदार कोण? अशी चर्चा सुरू झाली तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, संजय हेमगड्डी यांची नावे चर्चेत होती. प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली होती. पण ऐनवेळी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेले माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांचे पुढे आले.
त्यामुळे इतर सर्वच इच्छुक नाराज झाले, मुस्लिम समाजातून ही विरोध करण्यात आल्याच्या बातम्या आल्या, शहराध्यक्ष चेतन नरोटे पण नाराज झाले. त्यामुळे आता बाबा मिस्त्री यांनी स्वतः खुलासा करत आपण इच्छुक नसल्याची घोषणा केली आहे.
मी जिथे इच्छुक आहे तिथून उमेदवारी दिली नाही, मला न विचारता मध्य साठी पक्षाने माझे नाव पुढे केले ते योग्य नाही म्हणून मी इतर कार्यकर्त्याला संधी मिळाली असे ते म्हणाले.
आता चेतन नरोटे, आरिफ शेख की इतर दुसरा उमेदवार काँग्रेस देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.