संतोष पवार यांना मार्ग सापडला ; दक्षिण साठी दिली मुलाखत ; शरद पवारांसमोर दमदार सादरीकरण
सोलापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे संख्या मोठ्या प्रमाणात वाढले असून जो मतदार संघ आपल्या पक्षाला नाही तिथेही अनेक इच्छा व्यक्त करीत आहेत.
सोलापूरच्या दक्षिण विधानसभा मतदारसंघावर अनेक नेत्यांचा डोळा आहे. सर्वाधिक इच्छुक त्या मतदारसंघात असून मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी सुद्धा या मतदारसंघात आपली मोर्चे बांधणी केली आहे. यंदा काही करून दक्षिण विधानसभा लढवायचीच असा त्यांचा निर्धार असून त्याच्यासाठी त्यांच्या व्हाईट हाऊस मध्ये वॉर रूम तयार करण्यात आले आहे. त्यातून त्यांचे सोशल मीडियाचे कामकाज सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दक्षिण विधानसभा लढवणार असल्याची घोषणा केली होती. पक्षाच्या बाबत त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पर्याय ठेवले आहेत दरम्यान त्यांचा कल हा तुतारी हाती घेण्याकडे असल्याचा दिसून आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे येथे सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. स्वतः शरद पवार आणि महिला आघाडीच्या फौजिया खान यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती झाल्या. यावेळी दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी संतोष पवार यांनी मुलाखत दिली. आपले दमदार सादरीकरण त्यांनी साहेबांसमोर केल्याची माहिती मिळाली आहे. एक मुलाखत देण्यासाठी दक्षिण मध्ये तयारी करत असलेले सिद्धेश्वर परिवाराचे नेते धर्मराज काडादी हे सुद्धा उपस्थित असल्याचे दिसत आहे.






















