विद्यापीठाची ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी ; परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय
सोलापूर : दि. 30 जुलै 2024 रोजी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ऑनलाईन पद्धतीने झालेल्या पेट -9 ह्या परीक्षेमध्ये माझ्याकडे आलेल्या तक्रारी नुसार एका विध्यार्थिनीचे मार्क व रजिस्ट्रेशन नंबर बदलला गेला आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे.
दि. 7 ऑगस्ट 2024 रोजी एका विद्यार्थिनीला ऑनलाईन मेलद्वारे विद्यापीठाडकून पाठवलेल्या रिजल्ट मध्ये 69 मार्क व 10 ऑगस्ट रोजी परत विद्यापीठाकडून रिजल्ट मेलद्वारे पाठवला गेला तेव्हा 56 मार्क तर पुन्हा तिसऱ्यांदा 11 ऑगस्ट रोजी त्या विध्यार्थिनींचा रजिस्ट्रेशन नंबर बदलला गेला.
अश्या चुका विद्यापीठाने घेतलेल्या सॉफ्टवेयर मुळे की कोणी जाणून बुजून यामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आहे याची चौकशी करून तात्काळ दोषीस कडक शासन व त्या विध्यार्थिनीस न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. अन्यथा पुढील तीव्र रोषास पूर्णपणे विद्यापीठ प्रशासन जबाबदार असेल. अश्या प्रकारचे निवेदन कुलगुरू प्रकाश महानावर यांना सिनेट सदस्य यतिराज होनमाने यांनी दिले यावेळी सामाजिक कार्यकर्ते चेतन शर्मा ही उपस्थित होते.
विद्यापीठाकडून रिजल्ट विषयात झालेला हा गोंधळ अत्यंत गंभीर असून ह्या सोबत चे काही परीक्षार्थी नां वयाचे कारण देत PHD कोर्स वर्क या परीक्षेला वेगळे सेंटर देखील देण्यात आले आहे. तसेच पेट -9 ची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी. संबंधितावर कारवाई व्हावी.
-यतिराज होनमाने (सिनेट सदस्य)