काका साठे खरटमल यांच्यासाठी बोलणार शरद पवारांना ; सुधीर खरटमल झाले पुन्हा सक्रिय
सोलापूर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. परंतु सर्वच नेत्यांनी खरटमल यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी विनंती केली आणि आपल्या पक्षांमध्ये कोणतेही अंतर्गत मतभेद नाहीत अशी माहिती पत्रकारांना दिली होती.
परंतु खरटमल हे राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी पुन्हा शहराध्यक्ष होण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे हे पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्षाचा राजीनामा योग्य नाही या भूमिकेतून जिल्ह्याचे अध्यक्ष बळीराम काका साठे यांनी वरिष्ठांशी बोलून खरटमल यांचा राजीनामा मंजूर करू नये यासाठी ही प्रयत्न केल्याचे दिसून आले.
आता काका साठे हे पक्षाचे नेते शरद पवार यांना भेटून खरटमल यांच्या बाबत बोलणार असून त्यांचा राजीनामा मंजूर करू नये अशी ही विनंती साहेबांकडे करणार असल्याचे काका साठे यांनी जिल्हा परिषदेत पत्रकारांना सांगितले.
दरम्यान आता अध्यक्ष खरटमल पुन्हा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी महेश कोठे, यु एन बेरिया, तौफिक शेख, भारत जाधव, मनोहर सपाटे, जनार्दन कारमपुरी, नाना काळे, अक्षय वाकसे, प्रमोद गायकवाड, शंकर पाटील, चंद्रकांत पवार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील नागरी सुविधा व समस्यांकडे पालिका आयुक्त यांनी लक्ष द्यावे या संदर्भात संबंधित खात्याशी चर्चा करुन तात्काळ या नागरी सुविधांचे व समस्यांचे निरसण करावे अशी मागणी निवेदनात द्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं करण्यात आली.