सोलापूरच्या बुरुड समाजाचा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना जाहीर पाठिंबा
42 सोलापूर लोकसभा भाजपा,शिवसेना, राष्ट्रवादी,मनसे,रासपा,आरपीआय,रयतक्रांती, संघटना मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना सोलापूर शहरातील मुरुड समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे.
आमदार विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार हरीष पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थिती बुरुड गल्ली भवानी पेठ येथे बुरुड समाजाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस बुरूड समाजाचे सोलापूर शहराध्यक्ष दशरथ वडतीले, नवनाथ सुरवसे, देविदास वडतीले, श्रीनिवास दायमा, राजाभाऊ काकडे, उद्योजक प्रमोद मोरे, संजय वडतिले, युवराज सुरवसे, सुनिल वडतीले आदी उपस्थित होते..
बुरुड समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम भाजप प्रयत्नशील आहे या पुढील काळातही भाजप बुरुड समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अस आमदार विजय देशमुख म्हणाले.
सत्तर वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने कायम बुरड समाजाला सत्तेपासून लांब ठेवले परंतु सर्व जाती धर्मामाच्या लोकांना बरोबर घेऊन जाणाऱ्या भारतीय जनता पार्टी मुळेच मी आमदार होऊ शकलो त्यामुळे लोकसभा निवडणुकीत समाजाने महायुती उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे अस आवाहन मूर्तिजापूरचे आमदार पिंपळे यांनी केले
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सोलापूर शहरातील बुरुड समाज एक दिलाने महायुतीचे उमेदवार आ. राम सातपुते यांना निवडून आणण्यासाठी काम करेल असं आश्वासन बुरुड समाजाचे सोलापूर शहराध्यक्ष दशरथ वडतीले यांनी यावेळी दिले. यावेळी बुरुड समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते