सोलापूर – संभाजीनगर येथे दिनांक 22 आक्टोबर रोजी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या दक्षिण विभागाच्या जुडो चॅम्पियनशिप स्पर्धेत कु प्रियंका संतोष दराडे हिने रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कु प्रियांका दराडे ही मूळची बार्शी तालुक्यातील भालगाव या गावची असून गावकऱ्यांनी या यशाबद्दल तिचे कौतुक केले आहे.
संभाजीनगर येथील चित्रकूट आंतरराष्ट्रीय विद्यालयाच्या क्रीडा प्रांगणात वेगवेगळ्या गटाच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये संजय घोडावत आंतरराष्ट्रीय विद्यालय अतिग्रे कोल्हापूर येथे शिक्षण घेत असलेली कुमारी प्रियंका संतोष दराडे हिने १७ वर्षाच्या आतील 40 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले आहे.
नोएडा (दिल्ली) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. या यशामध्ये तिचे क्रीडा प्रशिक्षक विष्णू पुजारी, एसआरव्हीएम जत चे सर्व शिक्षक व क्रिडा शिक्षक सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांचे वडील संतोष दराडे व आई योग प्रशिक्षक सौ मनीषा दराडे यांनी प्रोत्साहन दिले. तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.